Coriander Market  
ताज्या बातम्या

Coriander Market : कोथिंबीर बेभाव; शेतकऱ्याने फिरविला पिकावर रोटाव्हेटर

कांद्यापाठोपाठ भाजीपाल्याचे दर घसरवले आहेत. त्यातच वादळी वाऱ्याचा फटका बसल्याने पिकाचे नुकसान झाले आहे.

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
मालेगाव, जि. नाशिक : कांद्यापाठोपाठ भाजीपाल्याचे दर (Vegetable rate) घसरवले आहेत. त्यातच वादळी वाऱ्याचा फटका बसल्याने पिकाचे नुकसान (Crop Damage) झाले आहे.

कांद्याला भाव नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवड (Vegetable Cultivation) केली. कुकाणे येथील विशाल ह्याळीज या तरुणाने २० गुंठ्यात कोथिंबीर लागवड (Coriander Cultivation) केली. गेल्या आठवड्यापासून कोथिंबिरीचे भाव घसरले आहेत.

कोथिंबिरीची जुडी एक ते दीड रुपयांप्रमाणे विक्री होत आहे. यामुळे लागवड व काढणी खर्चही निघत नसल्याने संतप्त झालेल्या युवा शेतकऱ्याने अर्धा एकर कोथिंबीर पिकावर रोटाव्हेटर फिरवला.


कुकाणे, वडगाव, वजिरखेडे व परिसरात मोठ्या प्रमाणावर भाजीपाला लागवड केली जाते. समाधानकारक पाऊस व मुबलक पाणीसाठा असल्याने येथील शेतकरी भाजीपालावर भर देत आहेत.

विशाल ह्याळीज यांनी कांदा पिकाची नुकसान भरपाई काढण्यासाठी १ फेब्रुवारीला कोशिंबिरीची लागवड केली. त्यांनी २० गुंठे क्षेत्रात २० किलो कोथिंबीर बियाणे टाकले होते. मार्चच्या प्रारंभी कोथिंबीर जोमात आली.

ह्याळीज यांना कोथिंबीर लागवडीपासून ते काढण्यापर्यंत ६ हजार ३०० रुपये खर्च आला. त्यातच अर्धा किलोची कोथिंबिरीची जुडी घाऊक बाजारात एक रुपयाला जात असल्याने लागवडीसाठी केलेला खर्चही निघेनासे झाला.

यामुळे संतप्त झालेल्या विशालने अर्धा एकर कोथिंबीर पिकावर रोटाव्हेटर फिरविला. शासनाने शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे लक्ष द्यावे. पंचनामे करून त्यांना नुकसानीपोटी मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

प्रतिक्रिया :
शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कायम आहे. त्यातच शेतमालाला भाव मिळणे मुश्‍कील झाले आहे. मजूर मिळत नाहीत. मजुरीचे दर वाढले आहेत. अशा परिस्थितीत जगावे की मरावे अशी स्थिती झाली आहे. व्याजाने पैसे काढून शेतकरी शेतात बि-बियाणे टाकून भाव नसल्याने शेतकऱ्यांचे हाल होतात. शेतमालाला योग्य भाव मिळावा. शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा.
- विशाल ह्याळीज, युवा शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Weather Forecast: कोकणात उष्ण, दमट हवामानाचा इशारा

Onion Procurement Policy: केंद्र सरकारचा कांदा खरेदीत हात आखडता

Tractor Heating in Summer: उन्हाळ्यात ट्रॅक्टर गरम होतोय? देखभालीच्या सोप्या ७ टिप्स!

Power Supply Issues: धान पिकाला विजेचा फटका

Weekly Market Issue: धाड आठवडी बाजार प्रश्नावर आंदोलनानंतर प्रशासनाचे आश्वासन

SCROLL FOR NEXT