Market Committee Agrowon
ताज्या बातम्या

Private Market Committees : राज्यातील खासगी बाजार समित्यांचेही होणार यंदा रॅंकींग

Smart Project : पणन संचलनालयाच्या स्मार्ट प्रकल्पातून अंमलबजावणी

Team Agrowon

विनोद इंगोले ः ॲग्रोवन वृत्तसेवा
Market Committees : अमरावती ः शेतकरी केंद्रित उपक्रम राबविणाऱ्या बाजार समित्यांना मा. बाळासाहेब ठाकरे ग्रामीण व्यवसाय व कृषी परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पा अंतर्गत रॅकींग देत त्यांना गौरविण्याची संकल्पना गेल्या वर्षीपासून राबविली जात आहे.

आता या संकल्पनेअंतर्गत परवाना मिळून दोन वर्ष झालेल्या खासगी बाजार समित्यांचाही अंतर्भाव करण्यात आला आहे. सद्या राज्यात अशाप्रकारच्या ६६ बाजार समित्या असल्याची माहिती स्मार्टचे तंत्र अधिकारी राजेंद्र पालेकर यांनी दिली.

बाजार समिती रॅकींग संदर्भाने जागृती करण्याच्या अनुषंगाने विदर्भात कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यानिमित्ताने दौऱ्यावर असलेल्या श्री. पालेकर यांनी ॲग्रोवन सोबत संवाद साधला ते म्हणाले, राज्यात एकूण ३०६ बाजार समित्या आहेत. त्याच्या सोबतीला ८८ बाजार समित्या खासगी आहेत. बाजार समिती कायद्यान्वये अस्तित्वात असलेल्या बाजार समित्यांसाठी वेगळे तर खासगी बाजार समित्याकरीता स्वतंत्र नियमावली तयार करण्यात आली आहे. यशदा मध्ये ७७ खासगी बाजार समित्यांच्या व्यवस्थापनाची कार्यशाळा पण घेण्यात आली. त्यांच्याकडून सूचना मागविण्यात आल्या. त्यावर पणन संचलनालयात चर्चा झाली.

त्याअंती निकष अंतिम करण्यात आले आहेत. रॅकींगसाठी यंदा पहिल्यांदाच खासगी बाजारांचाही विचार करण्यात आला आहे. खासगी बाजार समितीला परवाना मिळून किमान दोन वर्षांचा कालावधी झालेला असावा. त्यानुसार सद्या राज्यात असलेल्या ८८ पैकी ६६ खासगी बाजार समित्यांचा परवाना कालावधी दोन वर्षाचा आहे. त्यांना यासाठी पात्र ठरविले जाणार आहे. राज्य तसेच आठ विभागस्तरावरही बाजार समित्यांना रॅकींग दिले जाणार आहे.

बाजार समित्यांच्या रॅकींगचे निकष
- कलम ५७ अंतर्गंत कार्यवाहीचा अवॉर्ड झालेला नसावा.
- कलम ४३ अंतर्गत संचालक मंडळावर बरखास्तीची कारवाई नको.
- कर्मचाऱ्यांची भविष्यनिर्वाह निधी व इतर देणी संबंधित खात्यात नियमित जमा करणे.


- लिलाव परिसरात रस्ते, ड्रेनेज, लिलावगृह/ओटे दर्जेदार असावे.
- भुईकाटा, इलेक्ट्रॉनिक काट्याची सोय.
- भाडेतत्वावरील गाळे, भूखंडाची नियमित भाडे वसुली.

रॅकींग मिळालेल्या बाजार समित्यांना पणन संचालकांकडून प्रमाणपत्र देण्यात येत होते. यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बाजार समित्यांना गौरविण्याचे प्रस्तावीत आहे.

नियमावलीतही सुधारणा करण्यात आली असून यंदा पहिल्यांदाच खासगी बाजार समित्यांनाही स्वतंत्रपणे रॅकींग दिले जाणार आहे. पणन संचालक शैलेश कोतमीरे यांच्या मार्गदर्शनात ही संकल्पना राबवली जात आहे.
- राजेंद्र पालेकर,
प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, पणन संचालनालय, स्मार्ट तंत्र अधिकारी,

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

MKCL Investment: ‘एमकेसीएल’ने सरकारमध्ये गुंतवणूक करावी; शरद पवार यांची अपेक्षा

Market License Cancellation: पणन संचालकांचा खासगी बाजारांवर कारवाईचा धडाका; ‘रामेश्वर, ‘कसमादे’, ‘जय गजानन’ बाजारांचे परवाने रद्द

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT