Weather Update Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : उत्तरेकडील वाऱ्यांमुळे गारठा कायम

उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्याच्या अनेक भागांत गारठा कायम आहे. कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र वगळता राज्याच्या सर्वच भागांत पारा १८ अंशांच्या खाली आहे.

Team Agrowon


पुणे : उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्याच्या अनेक भागांत गारठा (Cold) कायम आहे. कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र वगळता राज्याच्या सर्वच भागांत पारा १८ अंशांच्या खाली आहे. धुळे येथील कृषी महाविद्यालय येथे शुक्रवारी (ता. ४) किमान तापमान ११ अंश सेल्सिअसवर आले आहे. आज (ता. ५) राज्यात निरभ्र आकाशासह कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे.
केरळ आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ३.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या प्रणालीपासून तमिळनाडू, दक्षिण अंदमान समुद्रापर्यंत हवेचा पूर्व-पश्‍चिम कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यातच दक्षिण अंदमान समुद्रात ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात वाढलेला गारठा कायम असून, पहाटे दव पडत आहे. दक्षिण महाराष्ट्रातील जिल्ह्यात अंशतः ढगाळ हवामान दिसून आले असून, कोकणासह कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांत किमान तापमानाचा पारा २० अंशांच्या वर आहे. उर्वरित राज्यात निरभ्र आकाशासह जोरदार वारे वाहत आहेत. राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.


शुक्रवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान. (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३१.७ (१३), जळगाव ३४.५ (१५), धुळे ३३ (११), कोल्हापूर ३१.६ (१८.७), महाबळेश्‍वर २५.२(१५.३), नाशिक ३१ (१२.९), निफाड ३१.२ (११.६), सांगली ३२.२ (१७.७), सातारा ३०.३ (१७.९), सोलापूर ३३ (१९.९), सांताक्रूझ ३४.९ (२०.६), डहाणू ३४ (१९.६), रत्नागिरी ३५.५ (२०.५), औरंगाबाद ३१.८ (१३.१), नांदेड ३२.२ (१६), उस्मानाबाद ३१.३ (१७.४), परभणी ३१.६ (१५), अकोला ३४.२ (१७), अमरावती ३३.४ (१५.५), बुलडाणा ३१ (१६.४), ब्रह्मपुरी ३३.८ (१७.३), चंद्रपूर ३२ (१६.२), गडचिरोली ३२ १६.२), गोंदिया ३२ (१६.२), नागपूर ३२.४ (१५.८), वर्धा ३२.५(१६.६), वाशीम ३२.४ (१६), यवतमाळ ३१.५ (१५).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sediment Measurement Technology: सेन्सर आधारित गाळ मापन तंत्रज्ञान

Sterile Insect Technology: फळमाशीवर मात करण्यासाठी ‘वंध्य कीटक तंत्रज्ञान’

Fodder Cultivation Technology|: सुधारित चारा वाणांसह लागवड तंत्राचाही प्रसार

Maharashtra Drought Situation: नियोजन दुष्काळ निवारण्याचे!

Nepal Natural Disaster: हिमालयाचा इशारा

SCROLL FOR NEXT