Ajit Pawar Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage: शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यास सरकारला भाग पाडू: पवार

गोगलगायींच्या (Snail Attack) प्रादुर्भावाने ३६०० हेक्टर क्षेत्रात नुकसान झालेला हा एकमेव भाग आहे. यामुळे शेतकऱ्यांना दुबार व तिबार पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली.

ॲग्रोवन वृत्तसेवा

अंबाजोगाई, जि. बीड : तालुक्यात गोगलगायीच्या (Snail) प्रादुर्भावाने झालेल्या नुकसानीचा प्रश्‍न विधानसभेत मांडणार असून, नुकसानभरपाई देण्यास आपण सरकारला भाग पाडू, असे आश्‍वासन विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी जवळगाव (ता. अंबाजोगाई) येथील शेतकऱ्यांना रविवारी (ता. ३१) येथे दिले.

पवार यांनी जवळगाव येथे गोगलगायीच्या प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या क्षेत्रास भेट देऊन, शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्या प्रसंगी त्यांनी हे आश्वासन दिले. यावेळी माजी पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) , आमदार संजय दौंड (Sanajy Daund) , जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, महसूल व कृषी अधिकारी यांची उपस्थिती होती.

गोगलगायींच्या (Snail Attack) प्रादुर्भावाने ३६०० हेक्टर क्षेत्रात नुकसान झालेला हा एकमेव भाग आहे. यामुळे शेतकऱ्यांना दुबार व तिबार पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. याची माहिती मिळताच विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रत्यक्ष भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. या वेळी शेतकऱ्यांनाही आपल्या व्यथा मांडल्या.

कृषी अधिकारी व शेतकऱ्यांनी दिलेल्या माहिती नंतर श्री. पवार यांनी या नुकसानीचे सरकारने तत्काळ पंचनाम्याचे आदेश देऊन शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. या नुकसानीबाबत पीकविम्यातही (Crop Insurance) अंतर्भाव नाही. त्याबाबत आपण विमा कंपन्यांशी चर्चा करू. मुंबईत गेल्यानंतर उच्च स्तरीय अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याची नुकसानभरपाई देण्यासाठी आपण सरकारला भाग पाडू, असे आश्‍वासनही त्यांनी शेतकऱ्यांना दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Red Sandalwood: लाल चंदन प्रकरणावर सहा महिन्यांत निर्णय घ्या

Farmer Support: टंचाईत शेतकऱ्यांना अडचणी भासू देऊ नयेत : पालकमंत्री बोर्डीकर

Farmer Support: गंभीर परिस्थितीत शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी : कृषिमंत्री भरणे

Drought Declaration Demands: प्रत्यक्ष नुकसानीच्या आधारे दुष्काळ जाहीर करा : झनक

Multi State Cooperative Society: एन साई मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीला ७ कोटी ९ लाखांचा नफा : ठोंबरे

SCROLL FOR NEXT