Summer Heat  Agrowon
ताज्या बातम्या

Summer Heat : राज्यात उन्हाचा चटका वाढणार

राज्याच्या विविध भागात सुरू असलेल्या वादळी पावसाने उघडीप दिली आहे.

Team Agrowon

Weather Update पुणे : राज्याच्या विविध भागात सुरू असलेल्या वादळी पावसाने (Heavy Rain) उघडीप दिली आहे. आज (ता. २१) विदर्भात विजांसह पावसाचा शक्यता (Rain Forecast) कायम आहे. तर उर्वरित राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाचा (Dry Weather) अंदाज आहे.

तर राज्यात उन्हाचा चटका वाढणार असून, कमाल तापमानात ३ ते ५ अंशांची वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने (Weather Update) वर्तविली आहे.

पावसाची उघडीप, निरभ्र आकाश यामुळे राज्यातील कमाल तापमानात पुन्हा वाढ होऊ लागली आहे. सोमवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये निफाड येथील गहू संशोधन केंद्रात येथे राज्यतील उच्चांकी ३५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३१ ते ३५ अंशांच्या दरम्यान होते. तर किमान तापमानाचा पारा १२ अंशांच्या पुढे कायम आहे.

दक्षिण कर्नाटकपासून मराठवाडा, पश्चिम विदर्भापर्यंत समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा तामिळनाडू ते छत्तीसगड पर्यंत विस्तारला आहे.

आज (ता. २१) विदर्भाच्या काही भागात विजा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज असून, उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे.

रविवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३१.८ (१६.४), जळगाव ३३.० (१६.६), धुळे ३४.० (१२.०), कोल्हापूर ३२.६ (१९.१), महाबळेश्वर २६.३ (१३.२),

नाशिक - (१६.१), निफाड ३५.२(१४.०), सांगली ३२.४ (१७.३), सातारा ३१.५ (१५.२), सोलापूर ३३.८(१९.०), सांताक्रूझ ३१.१ (२२.२), डहाणू ३१.८ (२२.१), रत्नागिरी ३२.० (२१.४),

छत्रपती संभाजीनगर ३०.३ (१३.२), नांदेड ३१.८ (१७.४), परभणी ३१.८(१८.०), अकोला ३२.२ (१६.६), अमरावती ३१.८(१५.५), बुलढाणा ३१.० (१७.२), ब्रह्मपूरी ३४.० (१७.६), चंद्रपूर ३३.४ (१७.४),

गडचिरोली २८.२(१७.६), गोंदिया २९.० (१६.४), नागपूर ३१.० (१७.१), वर्धा ३१.२(१७.८), वाशीम ३१.८ (१५.४), यवतमाळ ३१.५ (१६.२).

मंगळवारी (ता.२१) राज्यातील वादळी पावसाचा इशारा दर्शविणारा नकाशा (स्रोत : हवामान विभाग) :

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

विदर्भ : बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Amravati Teachers Constituency : अमरावती शिक्षक निवडणूक: शिक्षकांच्या मतांवर कोणाचा ताबा? मतविभाजन ठरणार निर्णायक

FFS App Fertilizer Booking : खत खरेदी आता झाली डिजिटल; २२ तारखेपासून घरबसल्या करा ऑनलाईन बुकिंग

Canal Water Release : पाण्याचा प्रश्न ऐरणीवर: बंधारे भरण्यासाठी कॅनॉलमधून पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची आर्त हाक

Women Farmers: आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त अकोल्यात महिला शेतकऱ्यांसाठी विशेष उपक्रम

Soybean Fodder Seized: कारंजा तालुक्यात २६० टन सोयाबीन कुटार जप्त; १० कारखान्यांना नोटिसा

SCROLL FOR NEXT