Grape Harvesting Agrowon
ताज्या बातम्या

Grape Harvesting : सांगली जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात

कमी दरामुळे उत्पादक संकटात; खरड छाटणी सुरू

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
सांगली ः जिल्ह्यातील यंदाचा द्राक्ष हंगामात (Grape Season) अंतिम टप्प्यात आला आहे. जत तालुक्यासह पलूस आणि तासगाव तालुक्यातील काही भागात द्राक्ष काढणी (Grape Harvesting) बाकी आहे.

हंगाम अंतिम टप्प्यात आला असला, तरी द्राक्षाच्या दरात वाढ झाली नसल्याने द्राक्ष उत्पादक (Grape Producer) हवालदिल झाला आहे. द्राक्षाला सध्या प्रति चार किलोस १२० ते १५० रुपये असा दर आहे.

जिल्ह्यात यंदाचा द्राक्ष हंगाम उशिरा सुरू झाला. एकाच वेळी द्राक्ष काढणीस आली. हंगामाच्या प्रारंभी द्राक्षाला प्रति चार किलोस ३५० रुपयांपेक्षा अधिक दर मिळाला.

परंतु हंगामाच्या प्रारंभापासून दर टिकून राहिले नसल्याचे चित्र होते. त्यानंतर वातावरणातील बदलामुळे आणि वाढत्या थंडीमुळे द्राक्षाची मागणी कमी झाली.

याचा परिणाम द्राक्षाच्या दरावर झाला. त्यामुळे द्राक्षाच्या दरात सुमारे १५ ते २० टक्‍क्यांनी घसरण झाली. दरम्यान, त्यामुळे अनेक द्राक्ष उत्पादक बेदाणा निर्मितीकडे वळाले आहेत.

गेल्या महिन्यापासून देशांतर्गत बाजारपेठेत द्राक्षाची मागणी वाढल्याने द्राक्षाचा उठावही होऊ लागला. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. मात्र हंगामाच्या मध्यापासून द्राक्षाच्या दरात वाढ झाली नाही.

त्यातच हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात द्राक्षाच्या दरात वाढ होते. परंतु यंदा हंगाम संपत आला तरी द्राक्षाच्या दरात वाढ झाली नाही. त्यामुळे खर्चही निघणे मुश्कील झाले आहे.

जत तालुक्यासह पलूस आणि तासगाव तालुक्यांतील काही भागांत द्राक्षाची काढणी सुरू आहे. त्यामुळे येत्या पंधरा दिवसांत हंगाम संपण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

खरड छाटणीस प्रारंभ
पुढील हंगामातील घडांची निर्मिती आणि फांद्यांची वाढ योग्य प्रकारे होण्यासाठी द्राक्षाची खरड छाटणी केली जाते.

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यात शेतकऱ्यांनी खरड छाटणीचे काम हाती घेतले आहे. शेतकरी खरड छाटणीचे नियोजन करीत आहेत.

यंदाच्या द्राक्ष हंगामात सुरवातीपासून अपेक्षित दर मिळाले नाहीत. हंगाम संपत आला तरी, दर वाढले नाहीत. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे.
- संजय बरगाले,विभागीय अध्यक्ष,
महाराष्ट्र, द्राक्ष बागायतदार संघ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT