Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage Compensation : दिवाळीपूर्वीच अतिवृष्टिग्रस्तांना मिळेल नुकसान भरपाईचा निधी

दिवाळी अंधारात जाईल, अशी भीती होती. मात्र, आता प्रशासनाने आलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचा निर्णय घेतला असून, तशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले आहेत.

टीम ॲग्रोवन

यवतमाळ : तलाठी व ग्रामसेवकांच्या बहिष्कारामुळे अतिवृष्टीची (Wet Drought) मदत येऊनही अडकली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी (Farmers Diwali) अंधारात जाईल, अशी भीती होती. मात्र, आता प्रशासनाने आलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचा निर्णय घेतला असून, तशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले आहेत.

गेल्या जून, जुलै व ऑगस्ट २०२२मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांच्या नुकसानीच्या भरपाईसाठी जिल्ह्यासाठी ६४३ कोटी ८१ हजार रुपये अनुदान प्राप्त झाले आहेत. हा निधी अर्थसंकल्पीय पद्धतीद्वारे वितरित करण्यात आलेला आहे. नुकसानीची मदत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, बहिष्कारामुळे आलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यात विलंब होत आहे.

शेतकऱ्यांना मदत मिळावी, म्हणून प्रशासनाने आता कंबर कसली आहे. १३ ऑक्टोबर रोजी तहसीलदार यांच्याकडील प्राप्त अहवालानुसार २०५ कोटी २२ लाख ८७ हजार रुपयांची देयके काढून तहसीलदार यांनी कोषागरात सादर केलेली आहे. ही रक्कम व उर्वरित रक्कमदेखील लवकरच दिवाळीपूर्वी संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या आहेत. गेल्या जून ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत जिल्ह्यात सततच्या पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता शासनाच्या वाढीव दराने ५१ कोटी १३ लाख ३१ हजार रुपये इतका निधी प्राप्त झाला आहे.

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान

गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. या पावसाने शेतकऱ्यांच्या घरात येणारे पीक येणार की नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे. सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT