Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage Compensation : मुख्यमंत्र्यांनी पाहणी केलेल्या वनकुटेला अद्याप मदत नाही

Maharashtra Crop Damage : वादळी पाऊस व गारपिटीने शेतीपिकांचे, घरांचे मोठे नुकसान झाले. त्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाहणी करून सात दिवसांत मदत देण्याचे आश्वासन दिले होते.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : वादळी पाऊस व गारपिटीने शेतीपिकांचे, घरांचे मोठे नुकसान झाले. त्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाहणी करून सात दिवसांत मदत देण्याचे आश्वासन दिले होते.

मात्र आता त्याला गुरुवारी (ता. ११) एक महिना लोटला. मात्र अजूनही कवडीचीही मदत मिळाली नाही. नुकसानीच्या पाहणीचा केवळ फार्स केला गेला, असा आरोप करत या भागातील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

नगर जिल्ह्यासह राज्यातील विविध भागात गेल्या दीड महिन्यात जोरदार वादळ, पाऊस, गारपीट झाली. त्याचा मोठा फटका शेतीला बसला. नगर जिल्ह्यात सुमारे पंचवीस हजार हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले.

पारनेर तालुक्यातील वनकुटे, पळशी, खडकवाडी आदी भागांत ७, ८ एप्रिलला जोरदार गारपीट, वादळी पाऊस झाला. या पावसामुळे या भागातील कांदा, कलिंगड, उन्हाळी पीक, भाजीपाला, फळपीके आदींचे मोठे नुकसान झाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ११ एप्रिल रोजी गारपिटीने नुकसान झालेल्या शेतीची, घराच्या पडझडीची पाहणी केली. त्यावेळी सात दिवसांत मदत मिळेल.

ज्यांच्या घराचे नुकसान झाले त्यांना तातडीने निवारा मिळेल, असे आश्वासन दिले होते. मात्र आता एक महिना उलटला आहे. दोन घरे वगळता अन्य नुकसान झालेल्या कुटुंबाला मदत मदत मिळाली नाही. वनकुटे व परिसरासह जिल्हाभरात वादळी पाऊस, गारपिटीने मोठे नुकसान झाले आहे. सात दिवसांऐवजी एक महिना उलटला तरी अजूनही मदत मिळाली नाही.

मी सरपंच असताना शबरी योजनेतून मंजूर असलेली २ घरकुले बांधली. या व्यतिरिक्त एक महिना उलटूनही एकही रुपयांची गावाला नुकसानीपोटी मदत मिळाली नाही. गावात मुख्यमंत्री येऊन काय फायदा झाला. मंत्र्याच्या गावांतील शेतकरी, नागरिकांना असे आश्वासन दिले असते तर अशी फसवणूक केली असती का? पाहणीचा केवळ फार्स केला. खरं तर संकटात सापडलेल्या शेतकरी, नागरिकांना तातडीने मदत मिळणे गरजेचे आहे. -
अॅड. राहुल झावरे, माजी सरपंच, वनकुटे ता. पारनेर

ते शेतकरी त्रस्त... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतर नेत्यांनी वनकुटे येथील बबन काळे यांच्या शेतातील नुकसानीची पाहणी केली होती. काळे यांच्या कांदा व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले.

‘‘मी स्वतः शेतकरी आहे. म्हणून तर थेट बांधावर पाहणी करायला आलो आहे. घरात बसून निर्णय घेणारा मुख्यमंत्री नाही. सात दिवसांच्या आत मदत मिळेल.

ज्यांच्या घरांचे नुकसान झाले त्यांच्या घराची दुरुस्ती केली जाईल’’ असे सांगितले होते. मात्र पाहणी केलेल्या आणि खांद्यावर हात ठेवून मदतीचे आश्वासन दिलेल्या शेतकऱ्यांनाही मदत मिळाली नसल्याने ते शेतकरी त्रस्त आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Beekeeping Subsidy Scheme: शेतकऱ्यांना मधमाशीपालनासाठी मिळणार ४५ लाखांपर्यंत निधी; जाणून घ्या राष्ट्रीय मधुमक्षिकापालन व मध अभियानाची सविस्तर माहिती

Village Adoption Campaign: जालन्यात गाव दत्तक अभियान

Farmer Support: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांचा पुढाकार; एक दिवसाचे वेतन देणार

Linseed Cultivation Practices: रब्बी हंगामासाठी जवस लागवड तंत्र

Irrigation Checking: सिंचन सुरु करण्यापूर्वी तपासा ५ गोष्टी, अशी करा तपासणी

SCROLL FOR NEXT