vijay javandhiya  Agrowon
ताज्या बातम्या

Vijay Jawandhiya : अर्थव्यवस्था मजबूत मग रुपयाचे अवमूल्यन कसे? विजय जावंधिया यांचा थेट सवाल

Indian Economy : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ९ वर्षांच्या कार्यकाळात देशाची अर्थव्यवस्था मजबूज झाली तर मग रुपयाचे अवमूल्यन का होत आहे? असा प्रश्‍न शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी थेट केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे पत्र पाठवून उपस्थित केला आहे.

Team Agrowon

Nagpur News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ९ वर्षांच्या कार्यकाळात देशाची अर्थव्यवस्था मजबूज झाली तर मग रुपयाचे अवमूल्यन का होत आहे? असा प्रश्‍न शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी थेट केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे पत्र पाठवून उपस्थित केला आहे. याच पत्रातून संभ्रामवस्था दूर करीत रुपयाच्या अवमूल्यनाबाबत खरी परिस्थिती सामान्यांसमोर आणण्याचे आवाहनही केले आहे.

विजय जावंधिया यांच्या माहितीनुसार, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अविश्‍वास प्रस्तावावरील चर्चेत सहभाग घेतला होता. या वेळी त्यांनी २०१३ पर्यंत देशाची अर्थव्यवस्था नाजूक असल्याचा उल्लेख केला. त्यासोबतच २०१४ म्हणजे पंतप्रधान मोदी यांनी देशाची सूत्रे सांभाळताच देशभरात भारतीय अर्थव्यवस्थेचे कसे कौतुक झाले आणि त्यात कशी सुधारणा झाली याविषयी भाष्य केले. परंतु हे भाष्य करताना त्यांनी कोणतेच ठोस पुरावे सादर केले नाहीत.

श्रीमंत असलेले अमेरिका, जर्मनी, चीन आज आर्थिक संकटात आहेत. त्या ठिकाणी व्याजदरात वाढ होत आहे. विकास दर तीन टक्‍क्‍यांपेक्षा कमी आहे. अशावेळी मोदी यांच्या नेतृत्वामुळे भारतीय अर्थव्यवस्था मजबूत असल्याचा दावा करण्यात आला. २०२२-२३ या वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ७.२ टक्‍के वाढली आणि २०२३-२४ मध्ये विकास दर ६.५ टक्‍के राहील, अशी शक्‍यता त्यांनी वर्तविली होती.

त्या वेळी अवमूल्यन आता का नाही?

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात डॉलरच्या तुलनेत रुपया ५४.३४ रुपये होता. याच मुद्यावरून विद्यमान पंतप्रधान मोदी त्यांना अवमूल्यनाबाबत विचारत होते. आता डॉलरचे मूल्य ८३ रुपये आहे. अर्थव्यवस्था मजबूत झाली असेल तर रुपयाचे अवमूल्यन का झाले? याचे उत्तर अर्थमंत्र्यांनी दिले पाहिजे, असा प्रश्‍न जावंधिया यांनी उपस्थित केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unseasonal Rain Relief GR: अवकाळीग्रस्त ९ जिल्ह्यांतील ६६ हजार शेतकऱ्यांना मोठा दिलासा, ५३ कोटी ७३ लाख मदत मंजूर

Cotton, Soybean Rate: हळदीच्या भावात सुधारणा होण्याचे संकेत आहेत का ?

Village Development: गावच्या विकास निधीसाठी आता ग्रामसेवकांचे प्रमाणपत्र अनिवार्य

Silk Production: ‘महारेशीम अभियाना’ला नांदेड जिल्ह्यात प्रतिसाद: वडवळे

Kharif Season: खरीप पिकांच्या ७० हजार क्विंटल बियाण्यांची मागणी

SCROLL FOR NEXT