Kisan andolan Agrowon
ताज्या बातम्या

KIsan Sabha : किसान सभेच्या मागण्या विभागीय आयुक्तांद्वारे मंजूर

शेतमजूर, आदिवासी समुदायाच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालय येथे तीन दिवस बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले होते.

टीम ॲग्रोवन

पुणे : शेतमजूर, आदिवासी समुदायाच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेच्या (Kisan Sabha) वतीने विभागीय आयुक्त कार्यालय येथे तीन दिवस बेमुदत धरणे आंदोलन (Protest) करण्यात आले होते. त्याची दखल घेत विभागीय आयुक्तांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत अनेक मागण्या मंजूर केल्या असल्याची माहिती किसान सभेच्या सूत्रांनी दिली.

विविध मागण्यांसाठी आदिवासी बांधवानी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर मुक्काम केला होता. या वेळी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार होती.

त्यानुसार ही बैठक नुकतीच पार पडली. या वेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त वर्षा लड्डा, महसूल उपआयुक्त नयना बोन्दार्डे, उपजिल्हाधिकारी संजय तेली, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, उपविभागीय अधिकारी सारंग कोडोलकर या वेळी उपस्थित होते.

बैठकीत झालेले प्रमुख निर्णय

आदिवासी कातकरी, ठाकर वस्त्यांना प्राधान्याने रस्ते मंजूर केले जातील. यासाठी शासनस्तरावर जमीन संपादन केली जाईल.

शिरूर व आंबेगाव तालुक्यातील भिल्ल, कातकरी, पारधी समाजाच्या नागरिकांना ओळखपत्रे देण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित केली जातील.

मावळ तालुक्यातील आदिवासी ठाकर जमातीच्या लोकांना जातीचे दाखले देण्याबाबत तत्काळ आदेश देण्यात आले.

शिरूर तालुक्यातील वनहक्क दाव्यांची तपासणी करून निर्णय घेण्यात येईल.

मूळ मालक असलेल्या आदिवासी बांधवांच्या जमिनी, बिगर आदिवासींकडे चुकीच्या पद्धतीने झालेल्या हस्तांतराबाबत तत्काळ निर्णय घेण्यात येतील.

खासगी शेतजमिनीवर वर्षानुवर्षे झोपडीत राहणाऱ्या आदिवासींच्या घराच्या जमिनीबाबत निर्णय कुळ कायद्यानुसार घेतला जाईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT