Central Citrus Research Institute Agrowon
ताज्या बातम्या

केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेने जपला अनोखा सेवाभाव

गरजूंना वितरित केले फळांसह विविध प्रकारचे साहित्य

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
नागपूर ः भारतीय स्वातंत्र्याचे हे अमृत महोत्सवी वर्ष असून या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदे (ICAR)अंतर्गंत असलेल्या केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेने (Central Citrus Research Institute) देखील सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत या निमित्ताने विविध कार्यक्रमाच्या आयोजनावर भर दिला आहे. त्यामध्ये रक्‍तदान, गरजूंना फळवाटप, वृक्षारोपण अशा उप्रकमांचा समावेश आहे.

केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेने समाजातील विविध घटकांशी जुळण्यावर भर दिला आहे. त्याअंतर्गंत पहिल्यांदाच उपेक्षित वस्त्यांमध्ये जात तेथील गरजूंना विविध वस्तुंचे वाटप करण्यात आले. रक्‍तदान हे राष्ट्रीय कर्तव्य मानले जाते. संस्थेने या राष्ट्रीय कार्यात आपला सहभाग नोंदविला. संस्थेतील ४० पेक्षा पुरुष व महिला कर्मचाऱ्यांनी रक्‍तदान केले. हेडगेवार रक्‍तपेढीच्या डॉ. हर्षा सोनी, किरण इंगोले, कल्पना कावळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. रक्‍तदात्यांना अमृत महोत्सवी टी-शर्ट तसेच अल्पोपहाराचे वितरण करण्यात आले. समाजाप्रती बांधिलकी जपत संस्थेच्या वतीने बेलतरोडी भागातील महाकाली नगर या उपेक्षितांच्या वस्तीत साहित्याचे वाटप केले गेले. त्यामध्ये फळ, कपडे, जेवणाचे डब्बे आदी बाबींचा समावेश होता. याकरीता निधीची उभारणी कर्मचाऱ्यांनी आपल्यास्तरावर ऐच्छिक पद्धतीने केली. तब्बल ३०० कुटुंबांना साहित्याचे वाटप करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. पंचवटी वृद्धाश्रम आणि श्रद्धानंद अनाथालय येथे नागपुरी संत्रा आणि लिंबाच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. वाडी पोलिस स्टेशनच्या परिसरातही हा उपक्रम राबविण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT