Election declared for 57 seats of 45 Gram Panchayats in Nandurbar 
ताज्या बातम्या

Gram Panchayat Election : नव्या वर्षातही ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी

नवे वर्ष निवडणुकीचे वर्ष ठरण्याची शक्यता आहे. नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, बाजार समित्या त्यानंतर आता ग्रामपंचायतींच्या निवडणुकाही या वर्षात होण्याची शक्यता आहे.

Team Agrowon

यवतमाळ : जिल्ह्यातील २०२३ या वर्षात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा प्रभागरचना कार्यक्रम निवडणूक आयोगाने (Election Commission) जाहीर केला आहे.

त्यामुळे या वर्षातही ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी (Grampanchyat Election) होणार आहे. विशेष म्हणजे २०२२मध्ये चुकीची प्रभागरचना झाल्यामुळे निवडणुका न होऊ शकलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकाही या वर्षात होणार आहेत.

नवे वर्ष निवडणुकीचे वर्ष ठरण्याची शक्यता आहे. नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, बाजार समित्या त्यानंतर आता ग्रामपंचायतींच्या निवडणुकाही या वर्षात होण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षभरापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झालेल्या नाहीत. परिणामी, सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा कारभार प्रशासकांच्या हाती आहे.

या वर्षात निवडणुका होण्याची शक्यता आहे. मात्र अजूनही प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही.

तत्पूर्वी ग्रामविकास विभागाने जानेवारी ते डिसेंबर २०२३ या काळात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

या वर्षात साधारणतः जिल्ह्यातील ४०च्यांवर ग्रामपंचायतीची मुदत संपत आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीची प्रभाग रचना नव्याने केली जाणार आहे.

यासोबत गेल्या वर्षी २०२२ मध्ये चुकीची प्रभागरचना झाल्यामुळे तसेच इतर प्रशासकीय कारणास्तव काही निवडणुका होऊ शकलेल्या नाहीत.

या ग्रामपंचायतींची प्रभागरचनाही नव्याने होणार आहे. ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकप्रक्रियेतील सदस्यसंख्या निश्‍चिती, प्रभागरचना यांचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

३० जानेवारीपासून प्रभागरचनेच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. १७ एप्रिलला जिल्हाधिकारी अंतिम प्रभागरचना जाहीर करणार आहेत. त्यामुळे एप्रिलनंतर पुन्हा जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगूल वाजण्याची दाट शक्यता आहे.

‘मिशन बिगेन अगेन’अंतर्गत प्रशासकीयस्तरावर कामाला गती आल्यानंतर राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. असे असले तरी आता या निवडणुकांना काही काळ अधिक लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

गेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी आपण नंबर वन असल्याचे दावे केले होते. आगामी निवडणुका पाहता या निवडणुकीतही सर्वच राजकीय पक्ष आपली ताकद लावणार असल्याचे दिसून येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT