Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage Compensation : मिळालेली भरपाईची मदत ‘ना थरीची, ना भरीची’

तब्बल दहा महिन्यांनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानीची रक्कम वर्ग झाली असली, तरी भरपाई तोकडीच आहे.

टीम ॲग्रोवन

सांगली : तब्बल दहा महिन्यांनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानीची रक्कम (crop Damage Compensation) वर्ग झाली असली, तरी भरपाई तोकडीच आहे. ही मिळालेली भरपाईची मदत ‘ना थरीची, ना भरीची’ अशी स्थिती असल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिल्या आहेत.

सांगली जिल्ह्यात गत वर्षात डिसेंबर महिन्यात अतिवृष्टी, परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. त्यामुळे द्राक्ष, डाळिंब पिकांसह अन्य पिकांचे शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत नुकसान झाले. या बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे झाले. त्यामुळे नुकसान भरपाई तातडीने द्यावी, अशी मागणी करून शेतकरी थकले.

ऐन हंगामात हाती शिल्लक असलेला पैसा संपला होता, त्यामुळे पिकं जगण्यासाठी उसनवार, कर्ज घेतली. वर्ष आर्थिक चणचणीत गेलं. द्राक्ष, डाळिंब बागा जगवण्यासाठी कर्ज घेण्याचा पर्याय होता. परंतु पहिले घेतलेले कर्जाची परत फेड झाली नव्हती. त्यामुळे दुसरे कर्ज मिळणार का असाही प्रश्न होताच.

तोकड्या मदतीनंतर शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर घातली आहे. तब्बल दहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर, अर्थात दिवाळीच्या दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम प्रशासनाने वर्ग केली. परंतु दहा महिन्यांनंतर मिळालेली भरपाईची मदत ‘ना थरीची, ना भरीची’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.

लाखाचे नुकसान भरपाई हजारांत

जिल्ह्यात गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीने द्राक्ष बागांचे अतोनात नुकसान झाले. लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. सध्या या नुकसानीने बाधित झालेल्या पिकांची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहे. द्राक्षाला हेक्‍टरी १८ हजार रुपये अशी भरपाई देण्यात येत आहे. नुकसान लाखाचे आणि भरपाई हजारात मिळत असल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी संतप्त झाले आहेत.

पावसामुळे बागेचे नुकसान झाले, त्याचे पंचनामे झाले. परंतु भरपाई नाही. सरकारी विभागात केवळ पाट्या टाकायचे काम करतात. त्या संदर्भात चौकशी केली, तर सविस्तर माहिती मिळत नाही. पंचनामे केल्यानंतर तीन महिन्यात भरपाई मिळाली तर त्या पैशांचा उपयोग करता येईल.
सचिन संख, द्राक्ष उत्पादक शेतकरी, जत, जि. सांगली
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळाली. द्राक्ष पिकासाठी हेक्‍टरी १८ हजार रुपये, अर्थात एकरी सात हजार दोनशे रुपये. ही रक्कम तोकडीच आहे.
चंद्रकांत लांडगे. मनेराजुरी, ता. तासगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Warehouse Receipt: पूर्व युरोप, मध्य आशिया खंडातील गोदाम पावती वित्तपुरवठा

Agriculture Development: दिशा कोरडवाहू शेती विकासाची!

Fake Agri Inputs: निविष्ठांवर सरकारचे नियंत्रण किती?

Whatsapp Chatbot: महसूल विभागाच्या सेवांसाठी देणार ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’

Eknath Shinde: कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणार नाही

SCROLL FOR NEXT