Weather Update Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : तापमानातील तफावत कायम; पहाटे गारठा आणि दिवसा उन्हाचा चटका

राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने पारा पस्तिशी पार पोचला आहे. तर किमान तापमान १० अंशांच्या खाली असल्याने उत्तर महाराष्ट्रात गारठा टिकून असल्याने कमाल आणि किमान तापमानातील तफावत कायम आहे.

Team Agrowon

Weather Update पुणे : राज्यात उन्हाचा चटका (Heat) वाढल्याने पारा पस्तिशी पार पोचला आहे. तर किमान तापमान (Minimum Temperature) १० अंशांच्या खाली असल्याने उत्तर महाराष्ट्रात गारठा (Cold Weather) टिकून असल्याने कमाल आणि किमान तापमानातील तफावत कायम आहे.

सोमवारी (ता. १३) सोलापूर येथे उच्चांकी ३७.२ अंश तर धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी ८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आज (ता.१४) कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज आहे.

उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात झालेली घट कायम आहे. धुळ्यासह निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ८.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. धुळे, पुणे, नाशिक आणि औरंगाबाद येथे किमान तापमान १० अंशांच्या जवळपास आहे. विदर्भासह मराठवाड्याच्या तापमानातही घट झाली आहे.

कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात मात्र किमान तापमानात मोठी घट झाली आहे. निरभ्र आकाश, स्वच्छ सूर्यप्रकाशामुळे उन्हाचा चटका वाढता असून, अनेक ठिकाणी तापमान पस्तिशी पार असल्याने उन्हाच्या झळा कायम आहेत.

सांगली, सांताक्रुझ, रत्नागिरी येथे तापमान ३६ अंशांपार आहे. विदर्भाच्या कमाल तापमानात घट झाली आहे.

राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात १२ ते २५ अंशांपर्यंत तफावत दिसून येत आहे. उत्तर महाराष्ट्रात पहाटे गारठा, दुपारी उन्हाच्या तीव्र झळा अशी स्थिती आहे. उत्तर भारतातील राज्यात थंडी कमी-अधिक होत आहे.

सोमवारी (ता. १३) पंजाबमधील अमृतसर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. १४) राज्याच्या तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

सोमवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३४.१ (१०.६), जळगाव ३३ (१०.१), धुळे ३२(८), कोल्हापूर ३५.०(१९), महाबळेश्वर ३१.६ (१३.४), नाशिक ३१.२ (१०.९), निफाड ३३.६ (८.२), सांगली ३६.१ (१७.३), सातारा ३५.२ (१६.४), सोलापूर ३७.२ (१६.५), सांताक्रूझ ३६.३ (२४.२),

डहाणू ३१.९ (१७.१), रत्नागिरी ३६.४(२१.२), औरंगाबाद ३२.२ (१०.२), नांदेड- (१६.२), परभणी ३४.४(१३.४), अकोला ३५.२ (१२.५), अमरावती ३२(१२.१), बुलडाणा ३३.०(१४.८), ब्रह्मपुरी ३३.७ (१४.६),

चंद्रपूर ३२(१३.६), गडचिरोली ३२.८(११.२), गोंदिया ३१ (११), नागपूर ३१.८ (११.७), वर्धा ३२.८(१४.८), यवतमाळ ३२ (११).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Machinery : महिला बचत गटांना ‘कृषी अवजारे बँके’ची सुवर्णसंधी

Akola Drought Update : अकोला जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा : गवळी

Jambatanda Storage Tank : जांबतांडा साठवण तलावासाठी प्रशासनाकडून हालचाली

Sangli Rainfall : सांगलीत ऑगस्टच्या पहिल्या २१ दिवसांत ५१ टक्के पाऊस

Water Security : नियोजनातून जलसुरक्षेचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न : डॉ. गेडाम

SCROLL FOR NEXT