Damage Due To Heavy Rain Agrowon
ताज्या बातम्या

सांगा आता शेतात माती कुठून आणू?’

शेतातील काळीभोर सुपीक माती पावसाच्या पाण्यासोबत प्रवाहाबरोबर बांध फुटून वाहून गेली. त्यामुळे शेतात मातिविना खाचा खळग्यांचा भूखंड उरला आहे.

Mukund Pingle

नाशिक : सिन्नर तालुक्यात मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) दाणादाण उडाली आहे. पावसाच्या पाण्यामुळे ओढे, नाले एक होऊन फुटल्याने पाणी शेतात शिरले. त्यामुळे तालुक्यातील वडगाव शिवारात दोन शेतकऱ्यांच्या ४८ गुंठे क्षेत्रातील काळीभोर सुपीक माती वाहून गेली. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. ‘‘सांगा आता माती कुठून आणू, अन् शेती करू?’असा प्रश्‍न उपस्थित करून शेतकऱ्याने आपली व्यथा मांडली.

गुरुवारी (ता. २३) सिन्नर महसूल मंडलात तीन तासांत ४० मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे ओढे, नाले एक झाले. त्यामुळे येथील शेतकरी रवींद्र नामदेव कडभाने (गट क्र. ५०३) व चंद्रभान सदाशिव कडभाने (गट क्र. ५०४) यांच्या शेतात पाणी शिरले. त्यामुळे शेताचे बांध फुटले. परिणामी, दोघांच्या प्रत्येकी ३३ गुंठे क्षेत्रापैकी रवींद्र यांच्या २५ गुंठे, तर चंद्रभान याच्या क्षेत्रातील २३ गुंठे क्षेत्रातील माती वाहून गेली. तर कैलास सुनील कडभाने यांच्याही शेतातील माती वाहून गेली.

त्यामुळे खरिपाच्या तोंडीच मोठे नुकसान वाट्याला आले. शेतातील काळीभोर सुपीक माती पावसाच्या पाण्यासोबत प्रवाहाबरोबर बांध फुटून वाहून गेली. त्यामुळे शेतात मातिविना खाचा खळग्यांचा भूखंड उरला आहे. तलाठी आणि कृषिसेवकाने घटनास्थळाची पाहणी करून शुक्रवारी (ता.२४) पंचनामा केला.

‘सांगा, आता शेती कशी पिकवायची?’

आता परिसरात काळीभोर माती नाही. त्यामुळे आता माती कुठून आणायची? पुन्हा पूर्वीसारखे शेत कसे तयार करायचे? पुन्हा उभे राहण्याचा अन शेती पिकविण्याचा हा प्रश्‍न उभा राहिला आहे. शासनाने नुकसानभरपाई देऊन पुन्हा उभे करावे, अशी मागणी होत आहे.

मला तीन एकर जमीन आहे. नैसर्गिक आपत्तींमुळे बागायती सुपीक जमिनीची माती वाहून गेली. या शेतात कांद्याचे प्रमुख पीक असायचे. खरिपात सोयाबीन पीक घेतल्यानंतर रब्बी कांद्याचे या क्षेत्रावर नियोजन होते. मात्र आता मातीच वाहून गेल्याने सर्व नियोजन कोलमडले आहे.
रवींद्र कडभाने, नुकसानग्रस्त शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा 344.74 कोटीं निधी वळवला

Silkworm Monsoon Care: पावसाळ्यात रेशीम अळी संगोपन करताना घ्यावयाची काळजी

Kisan Credit Card: किसान क्रेडिट कार्ड : मत्स्य व्यवसायासाठी आर्थिक सक्षमीकरण

Monsoon Parasite Control: पावसाळ्यातील परजीवी कीटकांचे एकात्मिक व्यवस्थापन

Animal Health Protection: पशू, मानव आरोग्याचे संरक्षण

SCROLL FOR NEXT