Sugarcane Crushing
Sugarcane Crushing Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Crushing : आठ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

Team Agrowon

पुरुषोत्तमनगर, जि.. नंदुरबार : सातपुडा साखर (Sugar) कारखान्याची अडीअडचणींवर मात करून वाटचाल सुरू आहे. सातपुड्याची चाके सुरू राहावीत यासाठी आपल्या सर्वांच्या मंजुरीने कारखाना गत वर्षी भाडे तत्त्वावर दिला आणि आपला हा सामूहिक निर्णय सर्वांच्या हिताचा ठरला असे प्रतिपादन सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांनी केले. दरम्यान, यंदा आठ लाख टन ऊस गाळपाचे (Sugarcane Crushing) उद्दिष्टे आहे.

पुरुषोत्तमनगर (ता.शहादा) येथील सातपुडा तापी परिसर सहकारी साखर कारखान्याची ५३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. चेअरमन दीपक पाटील अध्यक्षस्थानी होते. या प्रसंगी, व्हाइस चेअरमन प्रेमसिंग आहेर, पंचायत समितीचे माजी सभापती माधव पाटील, श्री नागाई देवी शुगरचे चेअरमन डॉ. रवींद्र चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्हाइस चेअरमन रवींद्र रावळ, विजय पाटील, जयप्रकाश पाटील, छोटूलाल पाटील, शंकर जिवाणी, गुलाबसिंग गिरासे उपस्थित होते. यावेळी सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सत्कार करण्यात आला.

गत जूनपर्यंत गाळप...

दीपक पाटील म्हणाले, सातपुडा साखर कारखान्याला विविध वित्तीय संस्था अर्थसाहाय्य करीत नसल्याने अडचणी येतात. कारखान्याची चाके भविष्यातही सक्षमपणे सुरू राहतील हा विश्वास आहे. गत हंगामात परिसरातील सर्व साखर कारखाने बंद झाल्यावरही सातपुड्याने संपूर्ण उसाचे गाळप करण्यासाठी जून महिन्यापर्यंत कारखाना सुरू ठेवला. शेतकरी सभासदांचे नुकसान होऊ नये याची काळजी घेत तोटा सहन करूनही कारखाना सुरू राहिल्याचे त्यांनी नमूद केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delhi Farmers' protest : भाजपच्या उमेदवारांविरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा रोष वाढला; एसकेएमचा विरोध कायम

Lok Sabha Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ लाख ५० हजार मतदारांचा कौल कोणाला? मतदान केंद्रे सज्ज

Fire in Nainital : उत्तराखंडच्या जंगलातील आग पोहचली शेताच्या बांधावर, एका महिलेचा होरपळून मृत्यू

Animal Ear Tagging : ...अन्यथा भरपाई अन् अनुदान नाही

Sunburn Crop : कोवळी रोपे वाचविण्यासाठी शेतकरी सरसावला

SCROLL FOR NEXT