St Bus Agrowon
ताज्या बातम्या

St Bus : एसटीच्या ‘बीओटी’तील कामात श्रीरामपूर स्थानक घ्या

श्रीरामपूर बस स्थानकास नव्याने ३५ बसची गरज असताना त्या राज्य परिवहन महामंडळाने अद्याप न दिल्याने प्रवासी सेवेवर परिणाम झाला आहे. प्रवाशांच्या तक्रारी वाढत आहेत.

Team Agrowon

नगर : राज्य शासनाने राज्यात राज्य परिवहन महामंडळाची (State Transport Corporation) २४ स्थानके बांधा व वापरा (बीओटी) या योजनेअंतर्गत विकसित करण्याचा प्रस्ताव घोषित केला. त्यासाठी जागतिक स्तरावर निविदा प्रसिद्ध होणार आहेत.

या २४ आगारांत नगर जिल्ह्यातील एकाही आगाराचा समावेश नसल्याने श्रीरामपूर प्रवासी संघटनेचे या बाबत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच संघटनेच्या सभेत श्रीरामपूर बस स्थानकाचा (Bus Stop) समावेश करावा, या मागणीचा ठराव केला.

प्रवासी संघटना सभेच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष रणजित श्रीगोड होते. बस स्थानक विकास योजनेत नगर विभागातील एकाही आगाराचा समावेश नसल्याबद्दल बैठकीत चर्चेत डॉ. गोरख बारहाते, डॉ. माधवी राजे, दत्तात्रेय काशीद, गणेश वाघ, भारत राऊत, किशोर अग्रवाल, भाऊसाहेब शिंदे, वैभव गायकवाड आदींनी भाग घेताना तीव्र नाराजी व्यक्त केली.

एसटी महामंडळाच्या मोकळ्या जागेवर राज्य शासनाचा ताबा घेण्याचा प्रयत्न आहे. माजी मंत्री राज्य परिवहन महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष (कै.) गोविंदराव आदिक यांनी श्रीरामपूर आगारालगतची जिनिंग मिलची जागा खरेदी करून, या जागेवर बीओटी तत्त्वावर अद्ययावत बस स्थानक, आगार व व्यावसायिक गाळे बांधण्याचा प्रस्ताव केला आहे. परंतु या प्रस्तावाकडे शासनाचे दुर्लक्ष झाले.

३५ बसेसची गरज

श्रीरामपूर बस स्थानकास नव्याने ३५ बसची गरज असताना त्या राज्य परिवहन महामंडळाने अद्याप न दिल्याने प्रवासी सेवेवर परिणाम झाला आहे. प्रवाशांच्या तक्रारी वाढत आहेत.

स्थानिक अधिकाऱ्यांना उत्तर देणे मुश्कील झाले आहे. नव्या बस शासनाने त्वरित द्याव्यात, असाही ठराव बैठकीत करून शासनाकडे पाठपुरावा करण्याचे ठरले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tree Plantation: नाशिकमध्ये एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प

Power Supply Issue: वीज कपातीमुळे पिके धोक्यात; संतप्त शेतकऱ्यांचा महावितरणवर धडक मोर्चा

Farm Loan Waiver: कर्जमाफीसाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक

Crop Damage Compensation: कोकणातील १ लाख ३४ हजार शेतकऱ्यांना दिलासा; २०९ कोटी मदत मंजूर, शासन निर्णय जारी

Nashik Rain Update: नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT