Abdul Sattar Agrowon
ताज्या बातम्या

Abdul Sattar : कृषिमंत्री सत्तारांचा राजीनामा घ्या

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरणारे कृषिमंत्री अब्दुल सत्तार चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

टीम ॲग्रोवन

यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याबद्दल अपशब्द वापरणारे कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) चांगलेच अडचणीत सापडले आहेत. राष्ट्रवादीकडून त्यांच्याविरोधात जोरदार संताप व्यक्त होत आहे.

यवतमाळ येथे राष्ट्रवादी काँग्रसेच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक बसस्थानक चौकात आंदोलन केले. मुख्यमंत्र्यांनी कृषिमंत्री सत्तार यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात राष्ट्रवादीने राज्यभर रान पेटविले. या आक्षेपार्ह विधाणाप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

स्थानिक बसस्थानक चौकात महिला राष्ट्रवादी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध आंदोलन केले. सत्तार यांच्या फोटोला जोडे मारत निषेध नोंदविला. यावेळी बाबासाहेब गाडे पाटील, महिला जिल्हाध्यक्ष सारीका ताजणे, अरुणा गावंडे, मनीषा काटे, मंजुळा तेजे, प्रियांका विरूटकर, प्रिया कडू, सीमा रहाटे, नीलिमा निंबाळकर, मीरा भोयर, संकेत टोणे आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Account Verification: शेतकऱ्यांच्या खात्यांची कर्जमाफीसाठी तपासणी

Monsoon In Kerala: आनंदघन केरळात

Onion Procurement Rules: कांदा खरेदीचे निकष शिथिल

Vidarbha Rain Forecast: विदर्भात वादळी पावसाचा इशारा

Dahivadi Heavy Rain: दहिवडी परिसराला पावसाने झोडपले

SCROLL FOR NEXT