Farmer Scheme Agrowon
ताज्या बातम्या

Vegetable Farming : ‘कीटकनाशके उर्वरित अंशमुक्त भाजीपाला प्रात्यक्षिकांचा लाभ घ्यावा’

या योजनेस भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, इच्छुक भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी प्रात्यक्षिकाचा लाभ घेण्यासाठी तालुक्याच्या पंचायत समिती कषी विभागाशी संपर्क साधावा.

Team Agrowon

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत (Agriculture Department) ‘लोकराजा राजर्षी शाहू महाराज सेंद्रिय शेती प्रोत्साहन योजना’ (Organic Farming Scheme) राबविण्यात येत आहे. यामध्ये कीटकनाशक उर्वरित अंशमुक्त भाजीपाला उत्पादन (Vegetable Farming) प्रात्यक्षिके घेण्यात येणार आहेत.

या योजनेस भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, इच्छुक भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी प्रात्यक्षिकाचा लाभ घेण्यासाठी तालुक्याच्या पंचायत समिती कषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी भीमाशंकर पाटील यांनी केले.

योजनेअंतर्गत टोमॅटो, वांगी, कोबी व फुलकोबी या चार भाजीपाला पिकांसाठी प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात येत आहे.

या पिकांवरील प्रमुख कीड विचारात घेऊन त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी लिंग प्रलोभन सापळे, चिकट सापळे, परभक्षी किडी, जैविक कीटकनाशके इत्यादींचा समावेश असणारे प्रात्यक्षिक संच रामेती, कोल्हापूर व तज्ज्ञ कृषी शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तयार केले असून त्याचा वापर करून कीटकनाशक उर्वरित अंशमुक्त भाजीपाला प्रात्याक्षिके आयोजित करण्यात येत आहेत.

योजनेअंतर्गत प्रति लाभार्थी किमान ०.१० हेक्टर व कमाल ०.४० हेक्टर क्षेत्रासाठी लाभ देण्यात येईल.

सहभागी शेतकऱ्यांनी, निश्चित केलेल्या प्रात्यक्षिक संचातील साहित्य स्वतः खरेदी करून त्याचा वापर करावयाचा असून त्यासाठी प्रति एकर प्रात्याक्षिकासाठी खर्चाच्या ५० टक्के कमाल टोमॅटो ५ हजार रु., वांगी व कोबी, फुलकोबी ४ हजार रु. याप्रमाणे अनुदान रक्कम थेट लाभ हस्तांतर पद्धतीने लाभार्थाच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Devendra Fadnavis On Ajit Pawar: 'मित्रशोक आपल्या अंतस्थ आत्म्यालाही जाळतो', अजितदादांच्या आठवणींनी मुख्यमंत्री फडणवीस भावूक

Agriculture Advisory: ढगाळ हवामान; किमान, कमाल तापमानात वाढ शक्य

Carbon Farming: कार्बन शेती : शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा नवा मार्ग

Sugarcane Workers: मजुरांचे तांडे परतीच्या वाटेवर; शिवार पुन्हा गजबजणार

Maharashtra Unseasonal Rain: विदर्भ, मराठवाडा, कोकणला अवकाळीचा तडाखा, गहू, हरभरा पिकाचे नुकसान

SCROLL FOR NEXT