Water Scheme  Agrowon
ताज्या बातम्या

Jal Jeevan Mission Yojana : ‘जलजीवन’चे काम सुरू न करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करा

Maharashtra Water Scheme : जलजीवन मिशन अभियानाअंतर्गत २०२३-२४ वर्षात जिल्हा परिषदेच्या ४६ कोटी व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या १५ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनांचा आराखडा अशा ६१ कोटींच्या नवीन कामांना मान्यता देण्यात आली.

Team Agrowon

Sangli News : जलजीवन मिशन योजनेतील कामे अद्याप ज्या ठिकाणी सुरू झालेली नाहीत, तेथील ठेकेदारांना काम सुरू करण्याच्या सूचना द्या, काम सुरू केले नाही तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून त्याचा अहवाल ३० मे पर्यंत सादर करा, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या.

डुडी म्हणाले, की जिल्ह्यातील ४ लाख ५९ हजार ४३ कुटुंबांना नळ जोडणी देण्यात येणार आहे. त्यापैकी ३ लाख ६२ हजार ८५० कुटुंबांना आतापर्यंत जोडणी देण्यात आली आहे. डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण करण्याची सूचना देण्यात आली आहे.

डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेत जिल्हा पाणीपुरवठा व स्वच्छता मिशन समितीची बैठक झाली. बैठकीस पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, वरिष्ठ भूवैज्ञानिक, वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिकारी, सर्व उपअभियंता उपस्थित होते.

या वेळी जलजीवन मिशन अभियानाअंतर्गत २०२३-२४ वर्षात जिल्हा परिषदेच्या ४६ कोटी व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या १५ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनांचा आराखडा अशा ६१ कोटींच्या नवीन कामांना मान्यता देण्यात आली.

तसेच भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणांकडील स्रोत बळकटीकरणासाठी ३९ गावांतील दोन कोटींच्या कामासही मान्यता देण्यात आली.

गत वर्षीच्या आराखड्यातून वंचित असलेल्या ५५ वाड्या-वस्त्यांसाठी तयार केलेल्या जिल्हा परिषदेकडील ४६ कोटी रुपयांच्या आराखड्याला, तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातून १५ कोटी रुपयांच्या आराखड्यासही मान्यता देण्यात आली.

याशिवाय १५ लाखांवरील कामांतून १९ गावांत १६ हजार ४५१ नळ जोडण्या देण्यात येणार आहेत. यासाठी ५.२५ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

३९ गावांतील स्रोत बळकटीकरण

भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने ३९ गावांतील स्रोत बळकटीकरण प्रस्तावित केले आहेत. भूपृष्ठीय उद्‌भव वगळता अन्यत्र उद्‌भव बळकटीकरणाचे काम द्यावे. यासाठी वरिष्ठ भू-वैज्ञानिक व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंत्यांची आढावा बैठक बोलवा, असे आदेश डुडी यांनी दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Machinery Subsidy: शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, अवजारे खरेदीसाठी अनुदान, कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी २० कोटींच्या निधीस मंजुरी

Farmer Loss: पूरग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित

Fertilizer Scam: जादा दराने खते, बियाणे विकणारी दुकाने तपासा

Atpadi Pani Tanchai: तीव्र पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर आटपाडी

Land Records Scam: जमिनीच परस्पर नावावर केल्या, पुण्यातील १२ अधिकाऱ्यांवर कारवाई

SCROLL FOR NEXT