Abdul Sattar agrowon
ताज्या बातम्या

Bogus Seed Update : बोगस बियाणे, खते विक्रेत्यांवर कारवाई करा

Abdul Sattar : यंदा खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते, बियाणे आणि कीटकनाशके योग्य दरात आणि वेळेत मिळायला हवीत.

Team Agrowon

Mumbai News : यंदा खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते, बियाणे आणि कीटकनाशके योग्य दरात आणि वेळेत मिळायला हवीत. काळाबाजार करणाऱ्या आणि बोगस बियाणे आणि खते विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करा, अशा सूचना कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी मंगळवारी (ता. २०) दिल्या. राज्यातील वरिष्ठ कृषी अधिकारी आणि कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली.

या बैठकीत सत्तार यांनी अकोला येथील छाप्याचा संदर्भ देत अधिकाऱ्यांना दोष दिला. आपल्यातीलच काही अधिकारी फुटीर आहेत. त्यामुळे ही माहिती बाहेर गेली असेही ते म्हणाले. कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुप कुमार यांनी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने केलेल्या तयारीचा आढावा घेतला.

कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना पेरणीपूर्व योग्य पीक पाणी सल्ला देणे गरजेचे आहे. हवामान विभागातील तज्ज्ञांच्या सल्ल्याने कृषी विभागाने यासंदर्भातील सूचना दिल्या पाहिजेत. त्याचबरोबर, वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांपासून अगदी गावपातळीवरील विभागाच्या अधिकारी-कर्मचारी यांनी थेट शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना पीकपेरणी संदर्भातील माहिती देण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

कृषिमंत्री सत्तार म्हणाले, ‘‘पावसाचे आगमन येत्या काही दिवसांत होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे या खरीप हंगामात पीकपेरणी नियोजनाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना कृषी विभागाने उपयुक्त सल्ला द्यावा.

'या हंगामात खते, बियाणे आणि कीटकनाशके त्यांना योग्य दरात आणि वेळेवर मिळतील, यासाठीची कार्यवाही करावी, तसेच, खते, बियाणे, कीटकनाशके विक्रीत काळाबाजार करणारे आणि बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करा. शेतकरी हा राज्याचा महत्त्वाचा घटक आहे.

शेतकरी संकटात येणार नाही, यासाठी आतापासूनच योग्य ती पूर्वतयारी आणि नियोजन करावे.’’ यावेळी कृषी आयुक्त सुनील चव्हाण या बैठकीस दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

छाप्याची बातमी फुटल्यावरून संताप

अकोला येथे बनावट बियाणांवरील छापा प्रकरणात खासगी व्यक्तीचा समावेश असल्यावरून सत्तार यांच्यावर चौफेर टीका झाली होती. तसेच राज्यात काही ठिकाणी टाकण्यात आलेले छापे वादग्रस्त ठरले होते. या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीत त्याचे पडसाद उमटले.

बोगस खते, बियाणे विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करा, असे निर्देश देताना सत्तार यांनी छापा प्रकरणात आपलेच काही अधिकारी फुटीर निघाले. त्यांनी ही बातमी फोडल्याने त्याचा बोभाटा झाला, असे म्हणून आपण शेतकऱ्यांना बांधील आहोत, त्यामुळे बनावटगिरी खपवून घेऊ नका, अशा सूचना दिल्या. शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांवर कडक कारवाई करा, असेही ते म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

MIDC Long March : एमआयडीसीविरोधात वर्णे ते सातारा ‘लाँग मार्च’

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

SCROLL FOR NEXT