Mantralay  Agrowon
ताज्या बातम्या

Shasan Aplya Dari : ‘शासन आपल्या दारी’तील उद्दिष्ट यंत्रणांनी पूर्ण करावे

Maharashtra Government : राज्यात शासकीय योजना लोकाभिमुख करून त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविले जात आहे.

Team Agrowon

Solapur News : ‘‘राज्यात शासकीय योजना लोकाभिमुख करून त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविले जात आहे. या अंतर्गत जिल्ह्याला ७५ हजार लाभार्थ्यांना एकाच वेळी शासकीय योजनांचा लाभ देण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे.

तरी सर्व शासकीय विभाग प्रमुखांनी परस्परांमध्ये योग्य समन्वय ठेवून आपल्या विभागास लाभार्थी निवडीचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे,’’ असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले. ‘शासन आपल्या दारी’च्या पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्री. शंभरकर बोलत होते.

या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले, उपजिल्हाधिकारी रोहयो चारुशीला देशमुख, उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक तीन श्रवण क्षीरसागर, उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख, महसूल तहसीलदार दत्तात्रेय मोहोळे, कृषी उपसंचालक राजकुमार मोरे, जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड, कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन जाधव उपस्थित होते.

शंभरकर म्हणाले, ‘‘‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत जिल्ह्यात मोठा कार्यक्रम घेण्याचे नियोजित आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून अंतिम तारीख लवकरच निश्चित होणार आहे. तरी सर्व संबंधित विभाग प्रमुखांनी आपापल्या विभागाच्या अधिनिस्त तालुकास्तरीय प्रमुख व त्यांचे कर्मचारी गावोगावी जाऊन शासकीय योजनांच्या त्यांची निवड करण्याबाबत कळवावे व लाभार्थी निवड यादी पुढील पंधरा दिवसांत प्रशासनाला सादर करावी.’’ पवार यांनी ‘शासन आपल्या दारी’ अभियानाबद्दल माहिती दिली. त्या म्हणाल्या, ‘‘हे अभियान राज्यात १५ एप्रिल २०२३ ते ३१ ऑगस्ट २०२३ या कालावधीत राबविण्यात येत आहे.’’

‘प्रत्येक तालुक्यातून १२ हजार लाभार्थी’

जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या तालुक्यातील शासकीय कार्यालयांना १२ हजार लाभार्थी निवडीचे उद्दिष्ट ठरवून द्यावे. तसेच मुख्य कार्यक्रमासाठी उपस्थित राहणाऱ्या लाभार्थ्यांची नावाची यादी तत्काळ तयार करावी. सर्व जिल्हास्तरीय यंत्रणा प्रमुखांनी त्यांच्याकडील तालुकास्तरीय अधिकाऱ्यांकडून लाभार्थी निवडीचे काम वेळेत पूर्ण करून घ्यावे, अशा सूचना पवार यांनी दिल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT