Crop Insurance Protest Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : पीकविमा परताव्यासाठी ‘स्वाभिमानी’चे आंदोलन

पीकविमा भरपाईबाबत ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी सातत्याने टाळाटाळ करीत असल्याच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मोर्शी तहसील कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करण्यात आले.

Team Agrowon

Amravati News पीकविमा (Crop Insurance) भरपाईबाबत ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी (Crop Insurance Company) सातत्याने टाळाटाळ करीत असल्याच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मोर्शी तहसील कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाची दखल घेत कंपनीकडून शेतकऱ्यांना शुक्रवारपर्यंत (ता. ३१) परतावा न मिळाल्यास कारवाईचे आश्‍वासन प्रशासनाकडून देण्यात आले.

ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीकडून पीकविमा परताव्याबाबत शेतकऱ्यांना वेठीस धरण्यात आले आहे. सातत्याने या प्रश्‍नी आंदोलन करूनदेखील कंपनीने त्याची दखल घेतली नाही. विशेष म्हणजे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयातही ‘स्वाभिमानी’ने याविरोधात आंदोलन केले होते.

त्यानंतर अनेकदा आंदोलनाच्या माध्यमातून या प्रश्‍नाकडे लक्ष्य वेधण्यात आले. गुरुवारी (ता. २३) पुन्हा एकदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मोर्शी तहसील कार्यालयामसोर कंपनीच्या धोरणाचा निषेध म्हणून अर्धनग्न आंदोलन करण्यात आले.

संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमित अढाऊ यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. प्रेम जवंजाळ, स्वप्नील कोठे, गोपाल नांदूरकर, स्वप्नील पाथरे, शाम अढाऊ, प्रवीण गतफने, प्रशांत शिरभाते, दिनेश आमले, कपील पडघन व शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.

या वेळी कंपनीविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर या ठिकाणी पोहोचलेल्या तालुका कृषी अधिकाऱ्यांनी विमा कंपनीकडून शुक्रवारपर्यंत (ता. ३१) विमा परतावा मिळाला नाही तर कारवाईचे आश्‍वासन दिले. त्यांच्या या आश्‍वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bajara Farming: बाजरीची पेरणी आणि खत व्यवस्थापन; चांगल्या उत्पादनासाठी महत्त्वाच्या गोष्टी

RBI MPC Meeting 2026: कर्जाचा हप्ता वाढणार नाही, पण कमी पावसामुळे महागाई वाढणार- आरबीआय गर्व्हनर

Modern Sowing Machines: पेरणीकरिता आधुनिक यंत्रांचा वापर

Crop Impact Management: विदर्भातील पर्जन्यमान अन् पिकांवरील परिणाम

Kharif Crop Planning: खरिपाच्या पूर्वतयारीसाठी हे मुद्दे नका विसरू

SCROLL FOR NEXT