Farmer Issue Agrowon
ताज्या बातम्या

Farmer Issues : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संघटना आक्रमक

विविध मागण्यांवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी देऊळगावराजा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात आंदोलन केले. आंदोलकांनी कीटकनाशकाच्या बाटल्या आणल्याने खळबळ उडाली होती.

Team Agrowon

बुलढाणा : शेतकऱ्यांना जाहीर झालेली मदत मिळाली नाही, शेतीसाठी दिवसा वीज दिली जात नाही, वन्यजीवांच्या ( Wildlife Animal) त्रासामुळे शेतकरी अडचणीत आहे.

अशा विविध मागण्यांवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani Shetkari Sanghatana) कार्यकर्त्यांनी देऊळगावराजा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात आंदोलन केले. आंदोलकांनी (Protest) कीटकनाशकाच्या बाटल्या आणल्याने खळबळ उडाली होती.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्वतःला कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात कोंडून घेत आंदोलन केले होते. यावेळी पोलिस प्रशासनाची तारांबळ उडाली.

शेतकरी सध्या अनेक अडचणींचा सामना करीत आहे. त्याला पीकविमा मिळाला नाही, शेतकरी दिवसभर शेतात राबतो मात्र, रात्री आराम करण्याऐवजी त्याला सिंचनासाठी शेतात जावे लागते.

अस्वल, रानडुक्कर या वन्यप्राण्यापासून शेतकऱ्यांच्या जिवाला धोका आहे. एक दिवसा लाइट द्या किंवा शेतकऱ्यांना स्वतःच्या रक्षणासाठी बंदुकीची परवानगी द्या, काही शेतकऱ्यांना तुटपुंजी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात टाकून कंपनीने शेतकऱ्यांची थट्टा केली.

त्यामुळे पीकविमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यात तत्काळ भरीव रक्कम जमा करावी, तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करावी, या मागणीसाठी स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते.

दरम्यान, संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत तसेच श्री. दांडगे व इतर अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना लेखी आश्वासन दिली.

यावेळी संघटनेचे विधानसभाध्यक्ष मधुकरराव शिंगणे, जिल्हा सरचिटणीस जुल्फिकार शेठ, तालुकाध्यक्ष गणेश शिंगणे, तालुका उपाध्यक्ष अंबादास बुरकुल, वसंतराव दहातोंडे, सिद्धार्थ पटावकर, प्रवीण राऊत, विठ्ठल भोरजे, श्याम राऊत,गुलाब नब्बी, गजानन गुढगे उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT