Sugarcane FRP Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane FRP : सांगलीत दुसऱ्या दिवशीही ऊसतोड बंद

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या ऊस तोड व ऊस वाहतूक बंदच्या आंदोलनाला शुक्रवारी (ता. १८) जिल्ह्यात शेतकरी, कारखानदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

टीम ॲग्रोवन

सांगली ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या ऊस तोड (Sugarcane Harvest) व ऊस वाहतूक (Sugarcane Transport) बंदच्या आंदोलनाला शुक्रवारी (ता. १८) जिल्ह्यात शेतकरी, कारखानदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान, उदगिरी साखर कारखान्याकडे ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर, बैलगाड्या रोखण्यात आल्या.

या वेळी ‘साखर सम्राटांचे करायचे काय, खाली मुंडी वर पाय,’ ‘एकरकमी एफआरपी मिळालीच पाहिजे,’ ‘तोडणी मजूर महामंडळ झालेच पाहिजे,’ आदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

जिल्ह्यात गुरुवारी (ता. १७) स्वाभिमानी शेतकरीने संघटनने पुकारलेल्या ऊस तोड बंद आंदोलनाला प्रतिसाद मिळाला. मात्र, रात्रीच्या वेळी साखर कारखान्यांनी ऊस वाहतूक सुरु ठेवली. दरम्यान, ‘स्वाभिमानी’ने रात्री ऊस वाहतूक करणाऱ्या रस्त्यावरच वाहने अडवून ठेवली. त्यांच्या चाकातील हवा सोडण्यात आली. या वेळी पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.

‘साखर सम्राटाचे आंदोलन मोडीत काढण्याचे षडयंत्र यशस्वी होऊ देणार नाही,’ अशी भूमिका शेतकरी संघटनेने घेतली आहे. ‘आम्ही शेतकऱ्यांसाठी लढत आहोतच. पण वाहतूकदारांसाठी तोडणी मजूर महामंडळाची स्थापना व्हावी, या साठी प्रयत्न करत आहोत,’’असे संघटनेतर्फे सांगण्यात आले. जिल्ह्यात २५० हून अधिक वाहने रोखण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT