Sugar Factory Agrowon
ताज्या बातम्या

Vasant Co-operative Sugar Factory : ‘वसंत’च्या गैरव्यवहाराची स्थगित चौकशी पुन्हा सुरु

तत्कालीन संचालक मंडळाच्या अडचणीत भर

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
उमरखेड, जि. यवतमाळ : वसंत सहकारी साखर कारखान्याच्या तत्कालीन संचालक मंडळाने केलेल्या अनियमितता व गैरव्यवहाराच्या तक्रारीच्या स्थगित चौकशीला सहकार मंत्र्यांच्या दालनात पार पडलेल्या सुनावणीदरम्यान कलम ८३ नुसार हिरवा कंदील मिळाला आहे. त्यामुळे आता पुन्हा ‘वसंत’च्या तत्कालीन संचालक मंडळाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

वसंत सहकारी साखर कारखान्यामध्ये गैरव्यवहार, बेकायदेशीर कामकाज व अनियमिततेबाबत चौकशी होऊन संबंधितांविरुद्ध कठोर कार्यवाही करावी, यासाठी संस्थेचे सभासद विलास चव्हाण, पी. डी. देशमुख, गजानन लोखंडे व रामराव कदम यांनी प्रादेशिक सह संचालक साखर अमरावती व शासनाकडे तक्रारी केल्या होत्या. याच्या चौकशीसाठी विशेष लेखा परिक्षक वर्ग-१ सहकारी संस्था साखर अमरावती यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांच्याकडून थातूर-मातूर चौकशी केल्याचा आरोप झाल्यानंतर सहाय्यक निबंधक सहकारी संस्था दिग्रस यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली.

चौकशीदरम्यान चौकशी अधिकाऱ्यांना कारखान्याकडून अपेक्षित दस्त ऐवज प्राप्त झाले नाहीत. या गैरव्यवहाराची कलम ८३ नुसार चौकशी सुरू असताना त्यावर तत्कालीन संचालक मंडळाने आक्षेप घेऊन चौकशीला स्थगिती मिळविली. या प्रकरणावर सहकारमंत्री अतुल सावे यांच्या दालनात १३ डिसेंबर रोजी पुनरिक्षण अर्जावर सुनावणी झाली. त्यानंतर या प्रकरणी तत्कालीन संचालक मंडळाच्या मागणीनुसार पुनरिक्षण अर्ज नामंजूर करण्यात आला. कारखानाच्या भंगार विक्री व इतर अनियमितता बाबतच्या कलम ८३ ची चौकशी कायम ठेवण्याचा निर्वाळा देण्यात आला. त्यामुळे तत्कालीन संचालक मंडळाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
......

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Early Banana Harvesting: आगाप कांदेबाग केळीची काढणी खानदेशात सुरू

Pandharpur ST Buses: आषाढी यात्रेसाठी एसटीच्या ५,५०० विशेष बसगाड्या

Coco Peat GST: बियाण्यांप्रमाणे कोकोपीटही जीएसटीमुक्त करण्यात यावे; राज्य भाजीपाला नर्सरी असोसिएशन

Collective Farming: कडूसच्या कृषी गटाकडून ‘सामूहिक शेती’

Agricultural Products GI Tag: ‘नाबार्ड’मुळे १७६ उत्पादनांवर ‘जीआय’ मानांकनाची मोहोर

SCROLL FOR NEXT