Fertilizer Agrowon
ताज्या बातम्या

Fertilizer Supply : डीएपीच्या नावावर ‘प्रॉम’, ‘पीडीएम’ खतांचा पुरवठा

चांदूर बाजार तालुक्यातील जसापूर येथे महिनाभरापूर्वी काही युवकांनी जाऊन सर्वेक्षण केले होते. यावेळी शेतकऱ्यांना घरपोच डीएपी खताचा पुरवठा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Team Agrowon

अमरावती : प्रॉम (फॉस्फेट रिच अॉर्गेनिक मॕन्यूअर) आणि पीडीएम (पोटॕश डिराईव्हड फॉर्म मोलॕसेस) खताची (Fertilizer) डीएपीच्या (DPA Fertilizer) नावावर विक्री करण्याचा गोरखधंदा शेतकऱ्यांनीच उधळून लावला. चांदूरबाजार तालुक्यातील जसापूर येथील या घटनेत पुरवठा (Fertilizer Supply) करण्यात आलेले खत रामतीर्थ येथील पातुर्डे कृषी सेवा केंद्रातील असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.

चांदूर बाजार तालुक्यातील जसापूर येथे महिनाभरापूर्वी काही युवकांनी जाऊन सर्वेक्षण केले होते. यावेळी शेतकऱ्यांना घरपोच डीएपी खताचा पुरवठा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र त्याकरिता आगाऊ नोंदणी करावी लागणार असल्याने ठराविक रक्कमेची मागणी करण्यात आली. प्रयोगशील शेतकरी प्रदीप बंड यांच्याकडूनही त्यांनी नऊ पोत्यांकरिता ३ हजार रुपये आगाऊ स्वीकारले.

मात्र हा सारा प्रकार बनवाबनवीचा असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याच वेळी प्रदीप बंड यांनी उपविभागीय कृषी अधिकारी राहुल सातपुते यांना माहिती दिली. शुक्रवारी (ता.७) छोट्या मालवाहू वाहनातून खत घेऊन काही युवक गावात आले. पडताळणीत प्रॉम आणि पीडीएम खत दिले जात असल्याचे लक्षात आले.

बॅगवर ५०० ते ६०० रुपये किंमत असताना शेतकऱ्यांकडून प्रत्येक पोत्यासाठी १५०० रुपये घेतले होते. कृषी अधिकाऱ्यांनी खत जप्त करून त्याचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठविले. त्याचा अहवाल आल्यानंतर कारवाई करू, असे सातपुते म्हणाले.

चांदूरबाजार तालुक्यात ४० बॕगांचा पुरवठा

चांदूरबाजार तालुक्यात ४० बॕग खतांचा पुरवठा करण्यात आला. हे खत दर्यापूर तालुक्यातील रामतीर्थ गावच्या पातुर्डे कृषी सेवा केंद्रातील असल्याची बाब प्राथमिक चौकशीत समोर आली आहे.

रोशन पातुर्डे हे या कृषी सेवा केंद्राचे संचालक असून त्यांची शेतकरी कंपनी असल्याचा खुलासा होताच दर्यापूर तालुका कृषी अधिकाऱ्यांनी तडकाफडकी रामतीर्थ गाठत संबंधितांची झाडाझडती घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे आता याप्रकरणी पुढील काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabbage Farming: कोबी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT