fertilizers Agrowon
ताज्या बातम्या

Fertilizers News: अखेर १०.२६.२६ खत दाखल

युरिया जिल्ह्यात मुबलक आहे. फक्त पोटॅशबाबत रावेर, यावल आदी भागांत मागणी आहे. परंतु काही शेतकरी ही समस्या लक्षात घेऊन विद्राव्य खतांच्या मदतीने ही टंचाई दूर करीत आहेत.

Team Agrowon

जळगाव ः जिल्ह्यात १०.२६.२६ खताची टंचाई (Fertilizer Shortage) दूर होत असून, नुकताच एक रेक म्हणजेच सुमारे २२०० टन खत (Fertilizer) दाखल झाले आहे. यातच शेतकऱ्यांनी एकाच कंपनीच्या कुठल्याही खताचा आग्रह करू नये, त्यामुळे अडचणी येतात, असे आवाहनही केले आहे.

जिल्ह्यात रब्बीच्या सुरुवातीलाच १०.२६.२६, पोटॅश या खतांचा तुटवडा होता. तसेच डीएपीदेखील अनेकांना मिळत नव्हते. याबाबत शेतकरी नाराजी व्यक्त करीत होते. या तक्रारी लक्षात घेता कृषी विभागाने खतांबाबत पाठपुरावा केला.

यानुसार मागील काही दिवसांत १०.२६.२६ या खताचा पुरवठा वेगात झाला आहे. वरिष्ठ कार्यालयाने देखील या समस्येची दखल घेऊन कार्यवाही केली असून, नुकताच २२०० टन १०.२६.२६चा पुरवठा झाला आहे. त्याचे वितरण लागलीच खते विक्रेत्यांकडे झाले असून, त्याच्या विक्रीबाबत कृषी विभागाचे निरीक्षण सुरू आहे.

आणखी २८०० टन १०.२६.२६ खत लवकरच दाखल होणार आहे. यामुळे रब्बी हंगामातील खतटंचाई दूर होईल. युरिया जिल्ह्यात मुबलक आहे. फक्त पोटॅशबाबत रावेर, यावल आदी भागांत मागणी आहे.

परंतु काही शेतकरी ही समस्या लक्षात घेऊन विद्राव्य खतांच्या मदतीने ही टंचाई दूर करीत आहेत. ड्रीपमधून विविध खते देत आहेत. त्यासाठी काहीसा अधिकचा खर्च येत आहे. परंतु खतांअभावी बागांवर परिणाम व्हायला नको, असा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत.

तसेच सध्या इतर खते मात्र मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यात सुपर फॉस्फेट पुरेसे आहे. लाल रंगाचे पोटॅशही आहे. परंतु शेतकरी त्याची उचल करीत नाहीत. विशिष्ट कंपन्यांचेच किंवा आयातीत पांढऱ्या रंगाचे पोटॅशची मागणी करतात.

तसेच १०.२६.२६ च्या देखील एकाच कंपनीच्या खताला उठाव असतो. हा आग्रह सोडून सर्व कंपन्यांच्या खतांचा उपयोग करायला हवा, असे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने म्हटले आहे.

खतांची टंचाई नव्हती. शेतकरी एकाच कंपनीच्या खताची मागणी करतात. यामुळे समस्या असते. परंतु १०.२६.२६ची मागणी लक्षात घेता त्याचा वेगवान पुरवठा जिल्ह्यात झाला असून, कुठेही टंचाई नाही.

- वैभव शिंदे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabbage Farming: कोबी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT