Sugar Cane FRP Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Rate : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटण्याची चिन्हे

उसाला एकरकमी ४ हजार रुपये दर मिळावा या मागणीसाठी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे टायर फोडण्यात आले.

Team Agrowon

इस्लामपूर, जि. सांगली : उसाला (Sugarcane Rate) एकरकमी ४ हजार रुपये दर मिळावा या मागणीसाठी बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने ऊस वाहतूक (Sugarcane Transport) करणाऱ्या ट्रॅक्टरचे टायर फोडण्यात आले. येथील आर आयटी कॉलेज, खुंदलापूर वसाहत, बोरगाव वाळवा रस्त्यावर मंगळवारी (ता. ८) सायंकाळी ट्रॅक्टरचे टायर फोडण्यात आले.

एकरकमी ऊसदर घोषित न केल्याने ऊसदर आंदोलन पेटण्याची चिन्हे आहेत. उसाला एकरकमी ‘एफआरपी’ घोषित न करता व शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निवेदन देऊनही कारखान्यांनी गळीत हंगाम प्रारंभ केला.

त्यामुळे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मंगळवारी सायंकाळी बळीराजा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ट्रॅक्टरचे टायर फोडले. तसेच अनेक ट्रॅक्टरच्या टायरमधील हवाही सोडली. त्यामुळे ऊसदराचे आंदोलन पेटण्याची चिन्हे आहेत. कारखान्यांनी दर जाहीर केल्याशिवाय ऊसतोडी स्वीकारू नये, असे आवाहन संघटनेने केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा 344.74 कोटीं निधी वळवला

Silkworm Monsoon Care: पावसाळ्यात रेशीम अळी संगोपन करताना घ्यावयाची काळजी

Kisan Credit Card: किसान क्रेडिट कार्ड : मत्स्य व्यवसायासाठी आर्थिक सक्षमीकरण

Monsoon Parasite Control: पावसाळ्यातील परजीवी कीटकांचे एकात्मिक व्यवस्थापन

Animal Health Protection: पशू, मानव आरोग्याचे संरक्षण

SCROLL FOR NEXT