Sugarcane Labor Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Labor : ऊसतोड कामगारांनी महामंडळाकडे नोंदणी करावी

Sugarcane Labor Corporation : ऊसतोड कामगारांना न्याय देण्यासाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येतात.

Team Agrowon

Pune News : ‘‘ऊसतोड कामगारांना न्याय देण्यासाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येतात. त्याचा लाभ घेण्यासाठी ऊसतोड कामगारांनी त्वरित महामंडळाकडे नोंदणी करावी,’’ असे आवाहन समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले.

ऊसतोड कामगार संबंधातील विविध प्रश्न आणि अडचणींबाबत चर्चा करण्यासाठी साखर आयुक्तालयात नुकतेच बैठकीचे आयोजन करण्यात आले. या वेळी डॉ. नारनवरे यांनी योजनांची माहिती दिली.

साखर आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, कामगार उपआयुक्त डॉ. संतोष कानडे, साखर आयुक्तालयाचे सहसंचालक संतोष पाटील, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, वेस्ट इंडिया शुगर मिल असोसिएशनचे कार्यकारी संचालक अजित चौगुले, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी आदी उपस्थित होते.

ऊसतोड कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून प्रत्येक नोंदणीकृत कामगारांचा विमा उतरविला जाणार आहे. महिलांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे. ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी प्रत्येक तालुक्यात वसतिगृहांची उभारणी करण्यात येईल.

यासाठी ऊसतोड कामगारांनी महामंडळाकडे त्वरित नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. कामगार विभागाच्या निर्देशानुसार अधिकारीदेखील भेटी देऊन निरीक्षण करतील, असे डॉ. कानडे यांनी सांगितले.

ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांबाबत विविध विभागांचा एकत्रितपणे मसुदा तयार करण्यात येईल. त्यानुसार शासन निर्णय करण्यात येईल.
- डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, साखर आयुक्त.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT