Sugarcane Harvesting Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Crushing : सातारा जिल्ह्यात ऊस गाळपास गती

जिल्ह्यात १४ साखर कारखान्यांचे गाळप हंगाम सुरू आहे. यामध्ये सात खासगी व सात सहकारी कारखान्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत असल्याने ऊस तोडणीवर काही प्रमाणात परिणाम होऊ लागला आहे.

Team Agrowon

Sugarcane Crushing Update सातारा ः जिल्ह्यात ऊस गाळपास (Sugarcane Crushing) गती आली असून, ७४ लाख २९ हजार ९४० टन उसाचे गाळप झाले असून, त्याद्वारे ७४ लाख ५८ हजार ५२५ क्विंटल साखर निर्मिती झाली आहे. साखर उताऱ्यात (Sugarcane Recovery) सुधारणा झाली असून, जिल्ह्यात सरासरी १०.०४ टक्के उतारा मिळत आहे.

जिल्ह्यात १४ साखर कारखान्यांचे गाळप हंगाम सुरू आहे. यामध्ये सात खासगी व सात सहकारी कारखान्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत असल्याने ऊस तोडणीवर काही प्रमाणात परिणाम होऊ लागला आहे.

१४ कारखान्यांकडून ७४ लाख २९ हजार ९४० टन उसाचे गाळप केले असून, त्याद्वारे ७४ लाख ५८ हजार ५२५ क्विंटल साखर निर्मिती झाली आहे.

यामध्ये ३० लाख ४९ हजार १४२ ऊस गाळपाद्वारे ३४ लाख दोन हजार ९५९ क्विंटल साखरेची निर्मिती झाली आहे. तर, खासगी कारखान्यांकडून ४३ लाख ८० हजार ७९८ टन ऊस गाळपाद्वारे ४० लाख पाच हजार ९३० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे.

सहकारी कारखान्यांचा साखर खासगी कारखान्यांच्या तुलनेत जास्त आहे. सहकारी कारखान्यांचा ११.१६, तर खासगी कारखान्यांचा ९.२६ टक्के मिळत आहे.

उसाचे वजन वेळेत चांगले यावे यासाठी ऊस तो़डणीचा शेतकऱ्यांकडून प्रयत्न केले जात आहे. याचा फायदा ऊसतोड मजूर ऊस तोडणी यंत्र मालकाकडून घेतला जात असून एकरी तीन ते पाच हजार रुपये घेतले जात आहेत.

उद्दिष्टासाठी गेटकेनला प्राधान्य

साखर कारखान्यांकडून गाळपाची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. यामुळे अनेक कारखान्यांनी कार्यक्षेत्राबाहेर ऊस तोडणी सुरू केली आहे.

यामुळे सभासद तसेच कार्यक्षेत्रातील उसाकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे शेतकऱ्यांत नाराजी आहे.

जिल्ह्यातील प्रमुख कारखान्यांची तो़डणी यंत्रणा विस्कळित झाल्यामुळे ऊस तोडणी वेळेत होत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fodder Management: कमी पावसाच्या स्थितीत चाऱ्याचे आत्तापासून करा नियोजन

Gharkul Yojana : सोलापुरात ३ हजारांहून अधिक घरकुल लाभार्थींना ७२२२ ब्रास वाळूचे वाटप

Weed Removal Begins: भात, नाचणी पिकांत तण काढणी सुरू

Sugarcane Dues : जिल्ह्यात ३३७ कोटींची ऊसबिले अद्यापही थकीत

Ravikant Tupkar: रविकांत तुपकरांना पोलिसांची नोटीस; पण आंदोलनावर ठाम

SCROLL FOR NEXT