Sugarcane Crushing Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Crushing : खानदेशात ऊस गाळप हंगाम पूर्णत्वाकडे

१९ लाख टनांवर गाळप

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
जळगाव ः खानदेशात ऊस गाळप (Sugarcane Crushing) पूर्ण होत आले आहे. फक्त काही कारखान्यांचीच तोडणी सुरू आहे. सुमारे १९ लाख टनांवर ऊस गाळप मागील आठवड्यापर्यंत झाले आहे. यंदा गाळपाची गती चांगली राहिली आहे.

सध्या पाऊस आहे, पण पावसापूर्वीच कमाल क्षेत्रातील ऊस तोडणी पूर्ण झाली होती. ही तोडणी पूर्ण होत आली आहे. या महिन्याच्या अखेरिस किमान ९५ ते ९७ टक्के ऊस गाळप पूर्ण होईल, असे दिसत आहे.

सर्वाधिक गाळप नंदुरबार जिल्ह्यातील समशेरपूर (ता. नंदुरबार) येथील खासगी कारखान्याने केले आहे. त्यापाठोपाठ जळगाव जिल्ह्यातील घोडसगाव (ता. मुक्ताईनगर) व चहार्डी (ता. चोपडा) येथील कारखान्याचे गाळप झाले आहे.

नंदुरबार जिल्ह्यात एक सहकारी व दोन खासगी कारखाने सुरू होते. तसेच तळोदा तालुक्यात खांडसरीदेखील कार्यरत आहे.

धुळ्यात एकही कारखाना सुरू नाही. परंतु जिल्ह्यातून जळगाव व नंदुरबारात ऊस पाठवणूक झाली आहे. साक्री तालुक्यात नाशिकमधील कारखान्याने ऊस तोडणी केली आहे.

यंदा ऊस गाळप परतीचा पाऊस लांबल्याने उशिरा सुरू झाले. पण व्यत्यय न आल्याने गाळप गतीने सुरू होते. मागील हंगामात अनेक शेतकऱ्यांच्या उसाची तोडणी एप्रिलअखेरही झालेली नव्हती. तसेच एप्रिलअखेरीस ऊस गाळप सुमारे १७ लाख टन झाले होते.

परंतु यंदा मार्चच्या तिसऱ्या आठवड्यातच ऊस गाळप सुमारे १९ लाख टन झाले आहे. सध्या पाऊस सुरू आहे. नंदुरबारमधील दोन कारखाने मध्य प्रदेशातूनही ऊस खरेदी करतात. या कारखान्यांच्या कामावर काहीसा परिणाम झाला आहे.

जळगाव जिल्ह्यात चहार्डी येथील कारखान्याचे गाळप मागील आठवड्यातही वेगात सुरू होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT