Sugarcane Crushing Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Crushing : चाळीस लाख टन उसाचे गाळप

चोवीस साखर कारखाने सुरू ः यंदाही गाळपात ‘अंबालिका’च पुढे

Team Agrowon

नगर ः जिल्ह्यात यंदाही साखर कारखान्यांचा गाळप हंगाम जोमात सुरू आहे. यंदा सुरू असलेल्या चोवीस साखर कारखान्यांकडून आतापर्यंत ४० लाख टन उसाचे गाळप, तर सुमारे पस्तीस लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. यंदाही साखर गाळपात कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखानाच आघाडीवर आहे.

नगर जिल्ह्यात यंदा १२ सहकारी, तर सात खासगी असे एकोणीस व नाशिक जिल्ह्यात चार सहकारी व एक खासगी असे पाच साखर कारखाने सुरू आहेत. या सर्व कारखान्यांनी नगर विभागात आतापर्यंत सुमारे ४० लाख टन उसाचे गाळप केले आहे. त्यात एकट्या नगर जिल्ह्याने ३५ लाख टन उसाचे गाळप केले असून, यंदा ही साखर गाळपात अंबालिका आघाडीवर आहे. एकट्या अंबालिका कारखान्याने सव्वापाच लाख टन उसाचे गाळप केले आहे. त्यानंतर सहकारमहर्षी विखे पाटील, भाऊसाहेब थोरात, मुळा, घुले कारखाना गाळपात पुढे आहे. यंदा दोन कोटी टनापर्यंत जिल्ह्यात गाळप होऊ शकते, असे सांगितले जात आहे.

कारखानानिहाय ऊस गाळप (टन)

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील (प्रवरानगर, लोणी)ः २ लाख ५५ हजार, कर्मवीर शंकरराव कोल्हे (कोपरगाव)ः १ लाख ७० हजार, कर्मवीर शंकरराव काळे (कोळपेवाडी, कोपरगाव)ः १ लाख ५ हजार, गणेश सहकारी ः वीस हजार, अशोक सहकारी (श्रीरामपूर) ः एक लाख ७५ हजार, सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे (श्रीगोंदा) ः २ लाख ४५ हजार, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात (संगमनेर) ः तीन लाख वीस हजार, मारूतराव घुले पाटील (भेंडा, शेवगाव) ः तीन लाख चाळीस हजार, वृद्धेश्वर सहकारी (पाथर्डी) ः एक लाख ३२ हजार, मुळा सहकारी (सोनई, नेवासा) ः अगस्ती सहकारी (अकोले) ः एक लाख पंचवीस हजार, संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे (केदारेश्वर, बोधेगाव) ः एक लाख पंधरा हजार, सहकारमहर्षी कुंडलिकराव जगताप (श्रीगोंदा) ः एक लाख नव्वद हजार, पियुष (वाळकी) ः ६५ हजार, अंबालिका (राशीन, कर्जत) ः पाच लाख पंचवीस हजार, गंगामाई ः २ लाख १० हजार, साईकृपा (देवदैठण) ः ३८ हजार, प्रसाद शुगर (वांबोरी) ः एक लाख ६५ हजार, जयश्रीराम (जामखेड) ः ६० हजार, युटेक (संगमनेर) ः एक लाख १८ हजार. के. के. वाघ (निफाड) ः ५० हजार, कादवा ः ९५ हजार, नाशिक सहकारी ः वीस हजार, वसंतदादा (कळवण) ः ३५ हजार, द्वारकाधीश ः एक लाख पस्तीस हजार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT