Agricultural University Agrowon
ताज्या बातम्या

VNMKV, Parbhani : इंद्रधनुष्‍य युवक महोत्‍सव स्‍पर्धेत ‘वनामकृवि’ चे यश

येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आंतर विद्यापीठ इंद्रधनुष्‍य युवक महोत्‍सव स्‍पर्धेतील विविध प्रकारांत घवघवीत यश संपादन केले.

Team Agrowon

परभणी ः येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील (Agricultural University) विद्यार्थ्यांनी आंतर विद्यापीठ इंद्रधनुष्‍य युवक महोत्‍सव स्‍पर्धेतील विविध प्रकारांत घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेचे आयोजन राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये ता. ५ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत करण्यात आले.

यावेळी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या संघांना व्‍यंगचित्र प्रकारात रौप्‍यपदक, माईम नाट्य प्रकारात रौप्‍यपदक, तर प्रश्‍नमंजुषेमध्‍ये कास्‍य पदक प्राप्‍त केले आहे. व्‍यंगचित्रात संदीप भुसारे याने रौप्‍यपदक तर माईम संघात सिध्‍देश्‍वर जाधव, अभिषेक देवद्वारे, शडानन शिराळे, अभिजित गर्वे, अंकिता मोरे, कृष्‍णाई इनामदार यांचा सहभाग होता. प्रश्‍नमंजुषा स्पर्धेमध्‍ये विशाल किटले, शुभम काळे, नागेश निर्मले या विद्यार्थ्‍यांचा समावेश होता.

संघ व्‍यवस्‍थापक म्हणून डॉ. आशा देशमुख, डॉ. विजय सावंत आणि डॉ. रामप्रसाद मोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कुलगुरु डॉ. इंद्र मणि, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, कुलसचिव डॉ. धीरजकुमार कदम, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ. सचिन मोरे यांनी यशस्‍वी विद्यार्थी-विद्यार्थींनीचे व संघव्‍यवस्‍थापक यांचे अभिनंदन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

Gokrupa Amrut Production: जालना जिल्ह्यात २ लाख ५८ हजार लिटर ‘गोकृपा अमृत’ निर्मिती

American Armyworm: ३ उपायांनी करा मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रण

Chilli Crop Management: मिरची पिकात वाढवर्धकांचा अनावश्यक वापर टाळा : डॉ. संजय पाटील

Sheep Grazing Permission: मेंढपाळांसाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय, २१ वन विभागांमध्ये मेंढी चराईसाठी परवानगी

SCROLL FOR NEXT