MPSC Exam Result Agrowon
ताज्या बातम्या

MPSC Exam Result : शेतकऱ्याच्या पोराची ‘एमपीएससी’त भरारी

आई-वडील शेतात राबणारे. पोराने शिकून चांगली नोकरी मिळावी, अशी अपेक्षा करताना पोराने मात्र ‘एमपीएससी’ परीक्षेत चांगलीच भरारी मारली आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News आई-वडील शेतात राबणारे. पोराने शिकून चांगली नोकरी मिळावी, अशी अपेक्षा करताना पोराने मात्र ‘एमपीएससी’ परीक्षेत (MPSC Exam) चांगलीच भरारी मारली आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठातील (Mahatma Phule Agriculture University) वसतिगृहात राहून शिकणाऱ्या वेळापूर (ता. माळशिरस) येथील अनिकेत सिद्धेश्‍वर माने-देशमुख या विद्यार्थ्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. विद्यापीठासह राज्यभरात या शेतकऱ्याच्या पोराच्या यशाचे कौतुक होत आहे.

सोलापूर जिल्ह्यातील वेळापूर (ता. माळशिरस) येथील सिद्धेश्‍वर माने- देशमुख हे साधारण शेतकरी. पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार. पाच एक शेती.ते ऊस, मक्यासारखी पिके घेत शेतीत वेगवेगळे प्रयोग करतात.

एकुलत्या एक मुलाने शिकून चांगली नोकरी मिळवावी, यासाठी त्यास उच्च शिक्षण देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानुसार राहुरी विद्यापीठात कृषी अभियांत्रिकीला प्रवेश घेतला. शिकता शिकता मुलगा अनिकेतने स्पर्धा परीक्षेचाही अभ्यास सुरू केला.

चार लाख विद्यार्थ्यांतून प्रथम

आधी दिलेल्या एका परीक्षेत थोडक्यात यश हुकले. मात्र २०२२ मध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक या पदासाठी झालेल्या परीक्षेत अनिकेतने कुठेही क्लास न करता आत्मविश्‍वासाच्या बळावर भरारी घेतली.

त्याने परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. या परीक्षेला राज्यातून जवळपास चार लाख विद्यार्थी बसले होते.

शेतात राबणाऱ्या माझ्या आई-वडिलांचे स्वप्न मी पूर्ण केले आहे.
- अनिकेत माने- देशमुख

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gladiolus Farming: डोंगराळ नागालॅंडमध्ये ग्लॅडिओलसची यशस्वी शेती

Fruit Farming: आपल्या फळांची प्रतिमा दुय्यम का?

Cyclone Threat: वेध चक्रीवादळांचा!

Pune Ganesh Festival: पुण्यात गणेशोत्सवाला दिमाखात प्रारंभ

Rice Crop Update: पावसाची उघडीप; भात पिके वाढीच्या अवस्थेत

SCROLL FOR NEXT