Milk Rate Agrowon
ताज्या बातम्या

Milk Rate : दुधाला ३४ रुपये दर देण्यासाठी अनुदान आवश्यक

Cow Milk Rate : राज्यातील गाईच्या दूध खरेदीसाठी ३.५/८.५ गुणप्रतीला प्रतिलिटर ३४ रुपये दर आज शासनाने निश्‍चित केला आहे.

Team Agrowon

Solapur News : राज्यातील गाईच्या दूध खरेदीसाठी ३.५/८.५ गुणप्रतीला प्रतिलिटर ३४ रुपये दर आज शासनाने निश्‍चित केला आहे. शासनाने निश्‍चित केलेला हा दर २१ जुलैपासून लागू केला जाणार आहे.

हा दर देण्यासाठी दूध संघांना शासनाने अनुदान द्यावे, अनुदान दिल्यास हा दर शेतकऱ्यांना देणे शक्य होणार असल्याची माहिती, सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी दिली.

राज्यातील खासगी व सहकारी दूध संघांमधून दिवसेंदिवस गाईच्या दूध खरेदी दरात कपात होत असल्याने सोलापूरसह इतर जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले होते. राज्यातील दूध दरासाठी आंदोलन झाल्यानंतर पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण पाटील यांनी पुण्यात बैठक घेतली होती.

या बैठकीत राज्यातील खासगी व सहकारी दूध संघाचे प्रतिनिधी, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांचा समावेश होता. सहकारी व खासगी दूध प्रकल्पाकडून खरेदी केल्या जाणाऱ्या ३.५/८.५ या गुणप्रतीच्या दुधाला किती दर असावा, हे ठरवण्यासाठी समिती नियुक्त करण्यात आली होती.

या समितीने सरकारला ३४ रुपये दराची शिफारस केली असून, ही शिफारस सरकारने स्वीकारली आहे. या संदर्भातील शासन निर्णय सरकारने आज घेतला आहे. या समितीने स्थानिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा आढावा घेऊन दर तीन महिन्यांनी दूध खरेदी दर निश्चित करावा. याबाबत शासनाला शिफारस करावी. शासनाने ठरवून दिलेल्या दूध दराची अंमलबजावणी होते की नाही? या बाबत जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी यांच्याकडून दरमहा अहवाल घेतला जाणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT