Paddy Plantation Agrowon
ताज्या बातम्या

Paddy Plantation : पुण्यातील विद्यार्थ्यानी लुटला भातलावणीचा आनंद

Agriculture Education : पुण्यातील बालाजीनगर येथील नाझरे (ता.भोर) येथील व्यंकटेश विद्या प्रशालेतील विद्यार्थी व शिक्षकांनी नाझरे (ता.भोर) येथील शेतक-यांच्या भातखाचरात भातलावणीचा आनंद लुटला.

Team Agrowon

Pune News : पुण्यातील बालाजीनगर येथील नाझरे (ता.भोर) येथील व्यंकटेश विद्या प्रशालेतील विद्यार्थी व शिक्षकांनी नाझरे (ता.भोर) येथील शेतक-यांच्या भातखाचरात भातलावणीचा आनंद लुटला.

व्यंकटेश विद्या प्रशालेतील ३५ विद्यार्थ्यांनी नाझरेतील शेतकरी अँड. राजेंद्र खोपडे आणि विजय खोपडे यांच्या शेतात भातलावणी केली. ग्रामीण भागातील शेतक-यांना अन्नधान्याची निर्मिती करण्यासाठी करावी लागणारी धडपड आणि प्रत्यक्ष शेतातील कामांचे प्रात्यक्षीक घेण्यासाठी शाळेमार्फत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

शाळेचे संस्थापक नितीन पोरे आणि मुख्याध्यापक पोपट गपाटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक, विद्यार्थी विद्यार्थिनींनी या उपक्रमात सहभागी झाले. नाझरे गावतील प्रगतशील शेतकरी जयवंत खोपडे आणि ८७ वर्षांचे बाजीराव खोपडे यांनी विद्यार्थ्यांना भातशेती आणि इतर पिकांच्या मशागचीबद्दलची माहिती सांगितली.

शेतकरी खोपडे यांनी विद्यार्थ्यांना चुलीवरची भाजी भाकरी, इंद्रायणी भात आणि वरण आदी पदार्थांचे जेवण दिले. शेतक-यांना कराव्या लागणा-या कष्टाची आम्हास जाणीव झाली असल्यामुळे यापुढे आम्ही अन्नाची नासाडी करणार नाही आणि अन्न वाया घालविणार नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dr. Anand Nadkarni : मनाला दिलासा देणारा आवाज हरपला; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे दुःखद निधन

Social Initiatives: सामाजिक कामांतही हवा कार्यक्षमतेचा, परताव्याचा विचार

Gender Equality: लैंगिक समानतेसाठी धोरणात्मक बदल अपरिहार्य

Non MSP Recommendations: बिगर हमीभाव शिफारशींचे काय ?

Baliraja Farm Road Scheme: मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी : जयकुमार गोरे

SCROLL FOR NEXT