Strawberry Season Agrowon
ताज्या बातम्या

Strawberry Season : स्ट्रॉबेरीचा हंगाम पावसामुळे लांबणीवर

पाऊस लांबल्याने पाचगणी आणि महाबळेश्वरमध्ये काही ठिकाणीच स्ट्रॉबेरीची लागवड करण्यात आली.

Team Agrowon

ऑक्टोबर अखेर आणि नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला स्ट्रॉबेरीचा हंगाम (Strawberry Season) सुरू होतो. यंदा, मात्र पाऊस लांबल्याने पाचगणी (Pachgani) आणि महाबळेश्वरमध्ये काही ठिकाणीच स्ट्रॉबेरीची लागवड (Strawberry Cultivation) करण्यात आली असल्याने यंदा हंगाम महिनाभर उशिराने सुरू होणार असल्याचे संकेत व्यापाऱ्यांनी दिले आहेत.

स्ट्रॉबेरी हे थंडीत पिकणारे फळ असल्याने त्याचा मुख्य बहर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी महिन्यात असतो. हा बहर जून महिन्यापर्यंत सुरू राहतो. डिसेंबर, जानेवारी महिन्यात सर्वाधिक स्ट्रॉबेरी बाजारात विक्रीसाठी दाखल होत असून ऑक्टोबरअखेर नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला वाशीच्या एपीएमसी बाजारात स्ट्रॉबेरी दाखल होण्यास सुरुवात होते. सध्या बाजारात स्ट्रॅाबेरीचे फक्त ५० बॉक्स दाखल होत आहेत. अशातच यंदा पाऊस लांबल्याने उशिरा लागवड झाली आहे; तर आधी लागवड केलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने स्ट्रॅाबेरी उशिरा दाखल होणार आहे.

आवक घटल्याने यंदा चढे दर

स्ट्रॉबेरीचे उत्पादन निघण्यासाठी दोन ते अडीच महिने कालावधी लागतो. त्यामुळे अद्याप लागवड न झालेल्या उत्पादनाला जानेवारी महिना उजाडेल, तर लागवड झालेले उत्पादन डिसेंबरमध्ये बाजारात दाखल होईल. त्यामुळे आवक कमी असल्यामुळे पाव किलोला ३०० ते ४०० रुपये बाजारभाव मिळत आहे.

Rabi Crop Loan : वर्धा जिल्ह्यात दुष्काळाचा पीककर्ज वाटपालाही फटका: रब्बी हंगामासाठी ७,६४५ शेतकऱ्यांना १२१ कोटींचे कर्जवाटप

Sustainable Farming : खानदेशात मोठा कृषी बदल: रासायनिक तणनाशकांचा वापर ३० टक्क्यांनी घटला

Rabi Season : खरिपानंतर आता रब्बी हंगामालाही दुष्काळाचा मोठा फटका; पाण्याअभावी पेरण्या रखडल्याने बळीराजा चिंतेत!

Old Farm Pond Lining Approval : शेतकऱ्यांची मोठी मागणी: जुन्या शेततळ्यांचे अस्तरीकरण नव्याने करण्यासाठी अनुदानास मंजुरी द्या!

Tembhu Project : सांगलीच्या दुष्काळी पट्ट्याला मोठा दिलासा: 'ताकारी आणि म्हैसाळ' योजना सुरू, आता 'टेंभू'चे आवर्तन कधी?

SCROLL FOR NEXT