Strawberry Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Strawberry Crop Damage : गारपिटीने स्ट्रॉबेरी पीक धोक्यात

Hailstorm Update : सलग दोन दिवस गारपिटीसह जोरदार पडणाऱ्या पावसाने स्ट्रॉबेरीसह इतर पिकांना फटका बसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

Team Agrowon

Satara Weather Update : सलग दोन दिवस गारपिटीसह (Hailstorm) जोरदार पडणाऱ्या पावसाने स्ट्रॉबेरीसह इतर पिकांना फटका बसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. जोरदार गारांच्या वर्षावाने स्ट्रॉबेरी शेतीत (Strawberry Farming) बर्फाची चादर पसरल्याने स्ट्रॉबेरी पीक धोक्यात आले आहे. वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहेत.

महाबळेश्‍वर तालुका हा दुर्गम भाग आहे. येथील मुख्य पीक स्ट्रॉबेरी असून, या पिकावर येथील शेतकऱ्यांचे जीवनमान अवलंबून असते. भिलार, गोडवली, खिंगर, राजपुरी आदी परिसरांत मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरी पीक घेतले जाते.

तालुक्यात सुमारे अडीच हजार हेक्टर क्षेत्रात स्ट्रॉबेरी लागवड होते. त्यातील भिलार परिसरात सुमारे तीनशे हेक्टर क्षेत्रात लागवड होते. गेले दोन दिवस पडणाऱ्या अवकाळी पाऊस व गारपिटीने परिसरातील स्ट्रॉबेरी फळांसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

गारपिटीने फळे व स्ट्रॉबेरीच्या रोपांची पाने खराब झाली आहेत. त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

स्ट्रॉबेरी ग्रोव्हर्स असोसिएशनचे अध्यक्ष नितीन भिलारे यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन स्ट्रॉबेरी शेतीची पाहणीही केली. या वेळी अध्यक्ष भिलारे म्हणाले, ‘‘अवकाळी पावसामुळे स्ट्रॉबेरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT