Crop Rate Agrowon
ताज्या बातम्या

Soybean Rate : सोयाबीन, कापूस दरासाठी राज्यभर आंदोलन : तुपकर

वाशीम येथे पत्रकार परिषदेत शासनाला इशारा

टीम ॲग्रोवन

वाशीम : यावर्षी अतिवृष्टी, परतीचा पाऊस (Heavy Rainfall) झाल्यामुळे सोयाबीन, कपाशीसह इतर पिकांचे (Crop Damage) प्रचंड नुकसान झाले. त्यातच परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावला. तर दुसरीकडे गतवर्षीच्या तुलनेत उत्पादन खर्चात दीडपट वाढ झाली आहे आणि नेमके उत्पादन (Crop Production) हाती येण्याच्या वेळी भाव गडगडले आहेत. एकंदरीत शेतकरी सर्वबाजूने अडचणीत सापडला आहे. अशावेळी शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज आहे.

सोयाबीनला साडेआठ हजार, कापसाला साडेबारा हजारांवर दर मिळावा, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, आदी मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन पेटविणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिली.

या आंदोलनाची सुरुवात बुलडाणा येथे ६ नोव्हेंबर रोजी आयोजित एल्गार मोर्चातून होणार असल्याचे ते म्हणाले. तुपकर रविवारी (ता. १६) वाशीम दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी ‘स्वाभिमानी’चे विदर्भ प्रदेश अध्यक्ष दामोदर इंगोले, केशव तोंडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

तुपकर पुढे म्हणाले, अतिवृष्टी, परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे अद्याप झालेले नाहीत. शासनाने जाहीर केलेली नुकसानभरपाई अत्यंत तोकडी असून कोणतीही मदत अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नाही. त्यात आता सोयाबीनचे दर पडले आहेत. सोयाबीनचा एका क्विंटलमागे खर्च ५७८३ आहे मात्र सध्या भाव ४ हजारापर्यत आहे. कापसाला क्विंटलमागे ८१८४ खर्च तर भाव ७ हजारांपर्यंत आहे.

यातून शेतकऱ्यांना उत्पादन खर्च देखील भरुन निघणार नाही. सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला तयार नाही, विरोधक सोयाबीन - कापसावर बोलायला तयार नाही, अशी परिस्थिती आहे. सोयाबीनचा भाव स्थिर राहावा यासाठी सोयापेंड (डीओसी) निर्यातीला प्रोत्साहन द्यावे, मागील वर्षी आयात केलेल्या ५ लाख मेट्रिक टन सोयापेंडला डिसेंबरपर्यंत दिलेली मुदतवाढ रद्द करावी, अशा विविध विषयांची माहिती त्यांनी दिली.

सोयाबीन, कापसासाठी राज्यभर आंदोलन पेटणार असून टप्प्याटप्प्याने हे आंदोलन तीव्र केले जाणार आहे. बुलडाणा येथे ६ नोव्हेंबर रोजी आयोजित एल्गार मोर्चापासून या आंदोलनाची सुरुवात होणार असून मोर्चात आंदोलनाची पुढील दिशा आणि आंदोलनाची रुपरेषा व रब्बीच्या अनुषंगाने मागण्या जाहीर करणार असल्याचेही ते म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT