Sand Agrowon
ताज्या बातम्या

Sand Depot : नायगावला राज्यातील पहिला वाळू डेपो सुरू

मंत्री विखे-पाटील यांच्या हस्ते विक्री सुरु

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Ahmednagar News : राज्यातील पहिला सरकारी वाळू डेपो (Sand Depot) नायगाव (ता. श्रीरामपूर, जि. नगर) येथे सुरु झाला.

महाराष्ट्र दिनी येथे महसूलमंत्री राधाकृष्‍ण विखे-पाटील यांच्या हस्ते सरकारी वाळू विक्रीला सुरवात झाली. एका कुटुंबाला एका महिन्यात अधिकाधिक १० ब्रास वाळू देण्यात येईल.

विखे-पाटील यांच्या संकल्पनेतून सर्वसामान्य जनतेला ६०० रुपयांत घरपोच वाळू देण्‍याचा निर्णय घेतला गेला. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे आता वाळूचे उत्खनन, साठवणूक व विक्री ऑनलाइन प्रणालीद्वारे करता येईल.


राज्यातील पहिल्या नायगाव वाळू डेपोसाठी गोदावरी नदीपात्रातून श्रीरामपूर तालुक्यातील मातुलठाण येथील तीन, तर नायगाव येथील दोन वाळूसाठे उपलब्ध आहेत.

या उत्खननाचा व वाळू डेपोचा ठेका श्रीरामपूर येथील संस्थेला दिला आहे. ग्राहकांना ‘महाखनिज’ या ऑनलाइन अॅपवर मागणी नोंदविल्यानंतर ६०० रुपये ब्रास व वाहनाच्या प्रकारानुसार प्रतिकिलोमीटर दर ठरवून घरपोच वाळू दिली जाईल.

वाळू चोरी सुरुच
नगर, बीड, जालना, पुणे, नांदेड, सोलापूर जिल्ह्यांतील मोठ्या नद्यांतून वाळूउपसा जोमात सुरु आहे. सहा ब्रास वाळू डंपरला ३० ते ३५ हजार रुपयांपर्यंत किंमत मोजावी लागत आहे. शासनाला मात्र यापासून एकही रुपया मिळत नाही.

सरकारी वाळू धोरण जाहीर झाल्यानंतर मात्र चार ते पाच हजाराने वाळू डंपरचा दर काही भागात कमी झाला आहे.

सरकारी वाळू विक्री सुरु होण्याआधी अधिकाधिक वाळू जमा करण्यासाठी वाळू चोरी करणाऱ्यांची धडपड सुरु आहे, अशी माहिती संबंधितांपैकी एकाने सांगितली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Surya Ghar Yojana: सौरऊर्जेतून घरगुती, कृषीला शाश्‍वत वीजपुरवठा

Solar Agriculture Pump: सौरपंपासाठी शेतकऱ्यांच्या नशिबी रखडपट्टीच

Crop Loan: कर्ज पुनर्गठनाची अंमलबजावणी रखडली

Tomato Late Blight: टोमॅटो पिकावरील उशिराने येणारा करपा नियंत्रणाचे सोपे उपाय

Nanded Degloor Expressway: नांदेड–देगलूर ग्रीनफिल्ड द्रुतगती महामार्गाला मिळणार गती

SCROLL FOR NEXT