Bee On Sunflower
Bee On Sunflower Agrowon
ताज्या बातम्या

मधमाशी विषयावर राज्यस्तरीय प्राचार्य-मुख्याध्यापक परिषद

Team Agrowon

नाशिक : शेतीक्षेत्र आणि ग्रामीण भागात सकारात्मक बदल घडवायचे असतील तर भावी पिढीला शालेय जीवनातच योग्य दिशा देणे गरजेचे आहे. याच अनुषंगाने पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) येथील बसवंत गार्डन येथे २५ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत ‘राज्यस्तरीय प्राचार्य-मुख्याध्यापक परिषदे’चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ‘ग्रीनझोन अ‍ॅग्रोकेम प्रा.लि.’ चे कार्यकारी संचालक संजय पवार यांनी दिली.

कृषी उद्योजकता वाढली तरच आपल्या कृषिप्रधान देशातील ग्रामीण युवकांना रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होतील. यासाठी शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना मनोरंजनातून ग्रामीण विकास आणि कृषी उद्योजकतेबद्दल माहिती देणे गरजेचे ठरते. याबाबत भावी तरुण पिढीत जाणीव-जागृती निर्माण करण्यासाठी शिक्षक आणि गुरुजनांचे मोठे योगदान असते.

याच अनुषंगाने होणाऱ्या या परिषदेचे उद्‍घाटन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्या हस्ते होणार असून, मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे हे अध्यक्षस्थानी असतील. तर राहुरी कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ यांचीही प्रमुख उपस्थिती असणार आहे.

बसवंत कृषी उद्योजक पर्यटन केंद्रामध्ये मधमाशीपालन, फळे भाजीपाला प्रक्रिया केंद्र, आदर्श ग्राम-सेवरगाव, ग्रामसंस्कृती केंद्र या प्रकल्पांबरोबरच करमणुकीसाठी गेम झोन सुरू केला आहे. या सर्व प्रकल्पांचे मुख्य आकर्षण असलेल्या मधमाशी उद्यानात मधमाशीबद्दल प्रात्यक्षिकांसह सविस्तर माहिती दिली जाते. अशा प्रकारचे मधमाशी आधारित पर्यटन म्हणजे ‘अ‍ॅपि-टुरिझम’चे हे देशातील नावीन्यपूर्ण व पहिलेच केंद्र असून त्यास पर्यटकांचा दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद लाभत असल्याचे संयोजकांनी सांगितले.

सहभागासाठी संपर्क साधावा

कार्यक्रम राज्यातील शाळा-महाविद्यालयातील प्राचार्य व मुख्याध्यापकांसाठी विनामूल्य आहे. या परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी बसवंत गार्डनशी (मोबाइल क्र.९६९९७८१६३९/७५०७७५७७००) संपर्क साधावा, असे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक डॉ. भास्कर गायकवाड यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT