Old Pension Scheme Agrowon
ताज्या बातम्या

Pension Scheme : ‘जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्यस्तरीय समिती स्थापणार’

‘‘जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न निकाली काढण्यासाठी राज्यस्तरीय समितीची स्थापना केली जाईल. या समितीमध्ये अर्थमंत्री, शिक्षण मंत्री आणि संबंधित मंत्री तसेच संघटनेच्या दोन सदस्यांचा सहभाग राहील. सर्व बाबी पडताळून योग्य निर्णय घेण्यात येईल,’’ अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केली.

Team Agrowon

रत्नागिरी : ‘‘जुन्या पेन्शन योजनेचा (Old Pension Scheme) प्रश्न निकाली काढण्यासाठी राज्यस्तरीय समितीची स्थापना केली जाईल. या समितीमध्ये अर्थमंत्री, शिक्षण मंत्री आणि संबंधित मंत्री तसेच संघटनेच्या दोन सदस्यांचा सहभाग राहील.

सर्व बाबी पडताळून योग्य निर्णय घेण्यात येईल,’’ अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी येथे केली.

रत्नागिरीत आयोजित शिक्षक मेळाव्यात ते बोलत होते. भविष्यात शिक्षकांवरील अतिरिक्त कामाचा भार कमी करणार असल्याचे ते म्हणाले.

तसेच शिक्षकांना मुख्यालयी राहण्याचे बंधन काढून टाकणार आहे. तसा जीआर लवकरच काढला जाईल. मुंबईत शिक्षक भवन साठी जागा देण्यात येईल. यातून मुंबईत शिक्षकांची राहण्याची व्यवस्था होईल, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

शिंदे म्हणाले, ‘‘हे सरकार तुमचे आहे. तुमच्या हिताचाच निर्णय घेऊ. जुन्या पेन्शनचा प्रश्न निकाली काढण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करणार आहे.

या समितीमध्ये अर्थमंत्री, शिक्षण मंत्री तसेच संबंधित मंत्री आणि आपला एक प्रतिनिधी घेत एकत्रित बैठक घेऊन मार्ग काढू. सकारात्मक निर्णय घेऊ. जे बोलू ते करू, चुकीचे आश्वासन कधीच दिलेले नाही.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Update: ३ जिल्ह्यांत विजांसह जोरदार पावसाचा इशारा; पावसाला पोषक स्थिती

Student Motivation: मेहनत, नावीन्याने यश शक्य : रवींद्र मेटकर

Zero Residue Grapes Production: ‘झीरो रेसिड्यू’ द्राक्ष उत्पादनाचेच ध्येय असावे

Sugarcane Water Management: उसासाठी पाण्याचे काटेकोर नियोजन

Buffalo Meat Exports : म्हशीचे मांस, दुग्धजन्य आणि कुक्कुट उत्पादनांची निर्यात वाढली; जागतिक बाजारपेठेत मागणी

SCROLL FOR NEXT