Sugar Factory AgrowonSugar Factory : ‘श्रीलक्ष्मी नृसिंह शुगर्स’च्या गाळप हंगामास प्रारंभ
ताज्या बातम्या

Sugar Factory : ‘श्रीलक्ष्मी नृसिंह शुगर्स’च्या गाळप हंगामास प्रारंभ

जिल्ह्यातील आमडापूर (ता. परभणी) येथील श्री. लक्ष्मी नृसिंह शुगर्सच्या पाचव्या गळीत हंगामाचा प्रारंभ रविवारी (ता. ६) कारखान्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक राजेंद्र नागवडे यांच्या हस्ते गव्हाण पूजन व मोळी पूजन करून करण्यात आला.

Team Agrowon

परभणी : जिल्ह्यातील आमडापूर (ता. परभणी) येथील श्री. लक्ष्मी नृसिंह शुगर्सच्या पाचव्या गळीत हंगामाचा (Sugar Factory) प्रारंभ रविवारी (ता. ६) कारखान्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक राजेंद्र नागवडे यांच्या हस्ते गव्हाण पूजन व मोळी पूजन करून करण्यात आला.

यावेळी ॲड नची जाधव, शांताराम अण्णा धनकवडे, संचालक संजय धनकवडे, संचालक प्रमोद जाधव यांच्या हस्ते मोळी टाकण्यात आली. यावेळी सरव्यवस्थापक अशोक थोरात, मुख्य अभियंता संजय पांगरकर आदी उपस्थित होते.

यावेळी ॲड. जाधव म्हणाले, की यावर्षी कारखाना प्रशासनाने या वर्षी ८ ते ९ लाख टन ऊस गाळपाचे उदिष्ट ठेवलेले आहे.लवकर ऊस गाळप व्हावे म्हणून दैनिक गाळपाची क्षमता पाच हजार टन केली आहे. आसवणी प्रकल्प लवकरच कार्यान्वित होणार आहे.

शेतकऱ्याना प्रथम उचल दोन हजार रुपये प्रमाणे देऊन एफआरपीनुसार ऊसाला दर देण्यात येईल तरी परिसरातील सर्व ऊस उत्पादकांनी आपला ऊस प्रोग्रामनुसार या कारखान्यास गाळपास द्यावा, असे आवाहन केले आहे.यावेळी कारखान्याचे शेतकी अधिकारी, कृषी सहाय्यक,कृषी पर्यवेक्षक,कर्मचारी,कामगार,परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT