Soybean Crop Dmaage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : तीन दिवसांपासून पाऊस; सोयाबीनमध्ये तळे

शहरासह तालुक्यात तीन दिवसापासून सुरु असलेल्या पावसाने हातातोंडाशी आलेलं सोयाबीनचं पीक पाण्यात गेलं असून पिकात पावसाचे पाणी साचल्याने शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होणार आहे.

टीम ॲग्रोवन

वाशी ः शहरासह तालुक्यात तीन दिवसापासून सुरु असलेल्या पावसाने हातातोंडाशी आलेलं सोयाबीनचं पीक पाण्यात (Soybean Crop Damage) गेलं असून पिकात पावसाचे पाणी साचल्याने शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान (Farmer Financial Loss) होणार आहे.

सोयाबीन पिकातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या उरल्यासुरल्या अपेक्षाही मावळल्या असून पावसाबरोबरच शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा पाऊस पडत आहे. मात्र शेतकऱ्यांचे हे अश्रू कोण पुसणार हा प्रश्न आहे. मंगळवारी सायंकाळी तांदुळवाडी (ता. वाशी) शिवारात ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे.

तालुक्यात सोयाबीनच्या पेरणीनतंर पावसाचा मोठा खंड पडला होता. त्यामुळे सोयाबीनच्या वाढीवर मोठा परिणाम झाला. यानतंर शंखी गोगलगायने व नतंर पिवळा मोझँक यामध्ये शेतकऱ्यांच प्रचंड मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

अशातही यावर्षी सोयाबीनला बाजारपेठेत चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा असल्याने शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करुण हे पीक मोठा खर्च करुण जगवले होत. जगवलेल सोयाबीन काही भागात काढणीला आलेल असतानाच पावसाने पुन्हा मागील तीन दिवसांपासून जोरदार हजेरी लावली आहे.

होत असलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या मिळणाऱ्या उत्पन्नाच्या सर्व आशा धुळीस मिळाल्या आहेत. बुधवार (ता. २१) रोजी ही दुपारी दोन वाजलेपासून शहरासह परिसरात कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरूच होता.

पाऊस मोजण्याची यंत्रणा नसल्याने अडचण

पाऊस मोजण्याची यंत्रणा गावनिहाय नसल्याने काही गावात झालेल्या जोरदार पावसाची नोंद शासनदफ्तरी होत नसल्याने शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीपासून वंचित राहावे लागत आहे .त्यामुळे गावनिहाय पाऊस मोजण्याची यंत्र बसवावीत अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Manoj Jarange Patil: माझ्याविरोधात तीन वर्षांपासून षड्‍यंत्र; मनोज जरांगे पाटील यांचा आरोप

Farmers Protest: अकोल्यात दुष्काळग्रस्त शेतकरी, श्रमिकांचा महामुक्काम सत्याग्रह सुरूच

Graduate Constituency: पदवीधर मतदारसंघासाठी आज मतदान; ८४२ केंद्रांवर प्रशासन सज्ज

Farm Loan Waiver Fourth List: कर्जमाफीची चौथी यादी जाहीर, १ लाख १५ हजार ६९७ पात्र शेतकऱ्यांचा समावेश

Fodder Self Sufficiency: दुष्काळात तोंगलाबादचा ‘चारा स्वयंपूर्णतेचा आदर्श ‘पॅटर्न’

SCROLL FOR NEXT