Ravikant Tupkar Agrowon
ताज्या बातम्या

Soybean, Cotton : सोयाबीन- कापूसप्रश्नी पाठपुरावा करू ः तोमर

तुपकरांची केंद्रीय कृषिमंत्र्यासह शरद पवारांसोबत चर्चा

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
अकोला ः राज्यातील सोयाबीन- कापूस प्रश्नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी बुधवारी (ता.१४) केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर, माजी कृषिमंत्री शरद पवार यांची भेट घेतली घेत चर्चा केली. सोयाबीन, कापसाच्या आयात-निर्यात धोरणात बदल करण्यासाठी शेतकऱ्यांच्या वतीने कृषिमंत्री या नात्याने पंतप्रधान व वाणिज्य मंत्र्यांना पत्र लिहून पाठपुरावा करावा, अशी मागणी तुपकर यांनी तोमर यांच्याकडे केली. यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘पाठपुरावा करतो,’ असे सांगितले.

तुपकर यांनी शरद पवार यांची भेट घेत सोयाबीन-कापसाच्या प्रश्नावर आपण हस्तक्षेप करून केंद्राकडे स्वतंत्रपणे हा प्रश्न लावून धरावा, अशी विनंती केली. यावेळी पवार यांनी प्रत्येक मागणीवर खुलासेवार चर्चा केली. वाणिज्य मंत्री व कृषिमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जीएम सोयाबीनला परवानगी मिळावी, ही मागणीही लावून धरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सोयाबीन, कापसाला दरवाढ मिळण्यासाठी केंद्र सरकारने आयात-निर्यात धोरणात बदल करून, यामध्ये सोयापेंड व सूत निर्यातीला प्रोत्साहन द्यावे, सोयापेंड आयात करणार नाही, हे केंद्र सरकारने स्पष्ट जाहीर करावे. यावर्षी १५ लाख मेट्रिक टन सोयापेंड निर्यात करावी, जीएम सोयाबीनच्या लागवडीस परवानगी द्यावी, सोयाबीनवरील पाच टक्के जीएसटी रद्द करावा, खाद्य तेलावरील (पाम तेल, रिफाइंड, सोयाबीन व सूर्यफूल तेल) आयात शुल्क ३० टक्के करावे, कापसाचे आयात शुल्क तांत्रिक दृष्ट्या ११ टक्के झाले आहे, ते नियमित लागू करावे, अशा मागण्या तुपकर यांनी केल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Heatwave: ‘वैशाख वणव्या’पूर्वीच होरपळ

Unseasonal Rain Relief GR: अवकाळीग्रस्त ९ जिल्ह्यांतील ६६ हजार शेतकऱ्यांना मोठा दिलासा, ५३ कोटी ७३ लाख मदत मंजूर

Cotton, Soybean Rate: हळदीच्या भावात सुधारणा होण्याचे संकेत आहेत का ?

Village Development: गावच्या विकास निधीसाठी आता ग्रामसेवकांचे प्रमाणपत्र अनिवार्य

Silk Production: ‘महारेशीम अभियाना’ला नांदेड जिल्ह्यात प्रतिसाद: वडवळे

SCROLL FOR NEXT