Solapur City  Agrowon
ताज्या बातम्या

Solapur News : ‘सोलापूरला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळण्यासाठी प्रस्ताव देणार’

Solapur : ‘सोलापूर हा धार्मिक पर्यटनस्थळांचा जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्याला तीर्थक्षेत्र जिल्ह्याचा दर्जा मिळण्यासाठी राज्य शासनाच्या संमतीने केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवू,’’ अशी ग्वाही पर्यटन, कौशल्य विकास आणि उद्योजकता, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी येथे दिली.

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Solapur City : सोलापूर : ‘‘सोलापूर हा धार्मिक पर्यटनस्थळांचा जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्याला तीर्थक्षेत्र जिल्ह्याचा दर्जा मिळण्यासाठी राज्य शासनाच्या संमतीने केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवू,’’ अशी ग्वाही पर्यटन, कौशल्य विकास आणि उद्योजकता, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी येथे दिली.

महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीचे उद्‍घाटन सोमवारी (ता.३) लोढा यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

या वेळी खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी, आमदार विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, रणजितसिंह मोहिते-पाटील, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या महाव्यवस्थापक श्रद्धा जोशी-शर्मा, पर्यटन संचालक बी. एन. पाटील, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, प्राचार्य चंद्रशेखर जयस्वाल आदी उपस्थित होते.

लोढा म्हणाले, ‘‘भविष्यात या महाविद्यालयातून पर्यटन क्षेत्रासाठी सर्वगुणसंपन्न विद्यार्थी तयार होतील. त्यातून सोलापूरच्या पर्यटन क्षेत्रवाढीसाठी मदत होईल.

त्यामुळेच या महाविद्यालयाच्या उद्‍घाटनासाठी गुरुपौर्णिमेचा दिवस निवडला. पर्यटन आणि हॉटेलिंग क्षेत्रासाठी उत्तमोत्तम शिक्षण व्यवस्था या महाविद्यालयात केली जाईल.’’

महाविद्यालयाला स्वामी समर्थांचे नाव  
जिल्ह्यात धार्मिक पर्यटनस्थळे अधिक असल्याने जिल्ह्यास तीर्थक्षेत्र दर्जा मिळावा, त्यासाठी आवश्यक सोयीसुविधा मिळाव्यात, तसेच या महाविद्यालयाचे श्री स्वामी समर्थ महाविद्यालय असे नामकरण व्हावे, अशी अपेक्षा या वेळी व्यक्त करण्यात आली.

लोकप्रतिनिधींच्या आग्रहानुसार या महाविद्यालयाचे नामकरण ‘श्री स्वामी समर्थ महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी,’ असे करत असल्याची घोषणा लोढा यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

MKCL Investment: ‘एमकेसीएल’ने सरकारमध्ये गुंतवणूक करावी; शरद पवार यांची अपेक्षा

Market License Cancellation: पणन संचालकांचा खासगी बाजारांवर कारवाईचा धडाका; ‘रामेश्वर, ‘कसमादे’, ‘जय गजानन’ बाजारांचे परवाने रद्द

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT