Soil Health Agrowon
ताज्या बातम्या

Soil Health : मातीच्या आरोग्यावर चर्चासत्रात मार्गदर्शन

जागतिक मृदा दिनानिमित्त खोडशी येथे कृषी महाविद्यालय, कराड व खोडशी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.

Team Agrowon

सातारा : जागतिक मृदा दिनानिमित्त खोडशी येथे कृषी महाविद्यालय, कराड व खोडशी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी कृषी महाविद्यालय, कराडचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, सहयोगी प्राध्यापक डॉ. दीपक दहात, डॉ. संपत कोळपे, डॉ. राजेंद्र हसुरे, सहाय्यक प्राध्यापक रामभाऊ हंकारे, सरपंच संभाजी भोसले, सह्याद्री सहकारी सहकारी साखर कारखान्याचे संचालक पांडुरंग चव्हाण, महेश काटकर तसेच प्रगतशील शेतकरी हंबीरराव भोसले उपस्थित होते.

डॉ. साताप्पा खरबडे यांनी शेतकऱ्यांना जैविक व रासायनिक पद्धतीने कीडनियंत्रण या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. जागतिकीकरण तसेच आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये आपल्या देशातील वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्य पुरविण्यासाठी तसेच उत्तम प्रतीच्या शेतमालाचे उत्पादन करून त्याची निर्यात करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. अधिक उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पिकांच्या सुधारीत वाणांचा वापर करणे आवश्यक असल्याचे डॉ. खरबडे यांनी आधोरेखित केले.

डॉ. संपत कोळपे यांनी मातीचे आरोग्य व एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करताना मृदा दिनाविषयी शेतकऱ्यांना माहिती दिली. माती परीक्षणाचे महत्त्व व त्याचे फायदे विशद करत असताना रासायनिक खतांचा वापर कमी करून जमिनीचे आरोग्य व सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्याबाबतचे विविध उपाय डॉ. कोळपे यांनी विशद केले. डॉ. राजेंद्र हसुरे यांनी रब्बी पिकांचे व्यवस्थापन याबद्दल मार्गदर्शन करताना रब्बी हंगामामध्ये घ्यावयाची पिके तसेच गहू व हरभरा पिकांच्या आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल शेतकऱ्यांना माहिती दिली.

ग्रामीण कृषी जागरूकता आणि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषिदूतांनी या चर्चासत्राचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषिदूत ज्ञानेश्वर गोल्हार यांनी केले, तर प्रास्ताविक गुरुनाथ मोहिते यांनी केले. विजय माने यांनी ग्रामस्थांच्या वतीने उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT