ताज्या बातम्या

Election : राज्यातील ६०८ ग्रामपंचायत निवडणुका जाहीर

राज्यातील सत्तांतरानंतर प्रथमच ६०८ ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या आहेत.

टीम ॲग्रोवन

मुंबई : राज्यातील सत्तांतरानंतर प्रथमच ६०८ ग्रामपंचायत निवडणुका (Gram Panchayat Election) जाहीर झाल्या आहेत. सरपंचांची निवड आता थेट होणार आहे. १८ सप्टेंबर रोजी मतदान, तर १९ सप्टेंबर रोजी मतमोजणी होईल.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Election) पावसाळ्यात घेण्याबाबत न्यायालयाच्या निर्देशानुसार जेथे पाऊस कमी आहे, अशा ठिकाणच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यानुसार राज्यातील ६०८ ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. १८ ऑगस्ट रोजी नोटीस प्रसिद्ध होईल.

२४ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत अर्ज दाखल करता येईल. दरम्यान २७, २८ आणि ३१ ऑगस्ट रोजी सुटी आहे. त्यामुळे या दिवशी अर्ज दाखल करता येणार नाही. २ सप्टेंबर रोजी अर्जांची छाननी होईल. ६ सप्टेंबरपर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहे. १८ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या कालावधीत मतदान होईल.

या जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींच्या निवडणुका

नंदुरबार-शहादा- ७४, नंदुरबार- ७५

धुळे-शिरपूर - ३३

जळगाव-चोपडा- ११ व यावल- २.

बुलडाणा-जळगाव (जामोद) १, संग्रामपूर - १, नांदुरा - १, चिखली- ३ व लोणार-२

अकोला-अकोट- ७ व बाळापूर- १.

वाशीम-कारंजा- ४.

अमरावती-धारणी- १, तिवसा-४, अमरावती-१ व चांदुर रेल्वे- १.

यवतमाळ-बाभूळगाव- २, कळंब- २, यवतमाळ- ३, महागाव- १, आर्णी- ४, घाटंजी- ६, केळापूर - २५, राळेगाव- ११, मोरगाव- ११ व झरी जामणी- ८.

नांदेड : माहूर- २४, किनवट- ४७, अर्धापूर- १, मुदखेड- ३, नायगाव (खैरगाव)- ४, लोहा- ५, कंधार- ४, मुखेड- ५, व देगलूर- १.

हिंगोली - (औंढा नागनाथ)- ६.

परभणी- जिंतूर- १ व पालम- ४.

नाशिक- कळवण- २२, दिंडोरी- ५० व नाशिक- १७.

पुणे - जुन्नर- ३८, आंबेगाव- १८, खेड- ५ व भोर- २.

अहमदनगर - अकोले- ४५. लातूर : अहमदपूर- १.

सातारा - वाई- १ व सातारा- ८.

कोल्हापूर - कागल- १

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Summer Fruits Market: उन्हाळी फळांची मागणी वाढली, आवक कमी, दर समाधानकारक

Alphanso Mango Farming: मुळशीतील शेतकऱ्यांची सिंधुदुर्गातील आंबा बागांना भेट

National Agriculture Seminar: कृषीच्या भवितव्याविषयी आजपासून राष्ट्रीय परिसंवाद

Pune Wheat Harvesting: पुणे विभागात गहू काढणीला सुरूवात

CM Devendra Fadnavis: ... न लाभलेला उत्कृष्ट मुख्यमंत्री!

SCROLL FOR NEXT