Shivar Feri Agrowon
ताज्या बातम्या

Shivar Feri : शालेय विद्यार्थांची कृषी महाविद्यालयामध्ये शिवारफेरी

Agriculture News : कृषी हा विषय शालेय शिक्षणात येणार, यावर सातत्याने चर्चा सुरू आहे.

Team Agrowon

Pune News : सर, ही गाय शिंग मारते का? ते वासरू कोणत्या जातीचे आहे? आम्हाला घरी या गाई सांभाळत येतील का? दुधाचे तुम्ही काय करता ? बायोगॅस कोठे वापरता ? आम्ही या कोंबड्या घरी नेऊ का? आम्हाला येथे प्रशिक्षण मिळेल का ?..... हे प्रश्न आहेत, शालेय विद्यार्थ्यांचे.

कृषी हा विषय शालेय शिक्षणात येणार, यावर सातत्याने चर्चा सुरू आहे. परंतु गोऱ्हे बुद्रुक (जि.पुणे) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी उपक्रमशील शिक्षक रजनीकांत मेंढे हे शाळेच्या मे महिन्यातील सुट्टीमध्ये उन्हाळी शिबिरात एक दिवस कृषी विषयासाठी राखीव ठेवतात.

‘तुरिय लॅब’च्या माध्यमातून शाळेमध्ये रोपवाटिका, कंपोस्ट खत निर्मिती, वनीकरण असे उपक्रम राबविण्यात येतात.

या प्रकल्पाच्या माध्यमातून रविवारी (ता.७) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थांची पुणे कृषी महाविद्यालयातील पशुसंवर्धन व दुग्ध शास्त्र विभागाच्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रामध्ये शिवारफेरी झाली.

यासाठी सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासाळकर, केंद्रातील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने, तांत्रिक प्रमुख डॉ. धीरज कणखरे यांचे सहकार्य मिळाले.

शिवारफेरीमध्ये विद्यार्थ्यांनी ११ देशी गोवंशांचे व्यवस्थापन, मुक्तसंचार गोठा, गांडूळ खत, बायो गॅस, दूध प्रक्रिया, सौर ऊर्जा, शेणापासून मूर्तिकला, लेअर आणि गावठी कोंबडीपालन प्रकल्पाला भेट दिली. यावेळी सिल्क आणि मिल्क या प्रकल्पातील तज्ज्ञ डॉ. संतोष मोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

डॉ. सोमनाथ माने म्हणाले, की महात्मा फुले कृषी विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या केंद्रामध्ये देशी गोवंश संवर्धन, प्रक्रिया उद्योगासंबंधी प्रशिक्षण दिले जाते. पुणे शहरातील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थांसाठी कृषी आणि गो पर्यटनाचे नियोजन केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT